टी २० वर्ल्ड कप २०२६ च्या स्पर्धेसाठी संघ निवड करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ मोठा डाव खेळणार आहे. गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एकही टी-२० सामना न खेळलेल्या पॅट कमिन्सशिवाय दुखापतीनं त्रस्त असलेल्या दोघांना संघातसामील करुन घेण्याचा प्लॅन कांगारुंच्या ताफ्यात शिजला आहे. पॅट कमिन्सशिवाय जोश हेजलवूड आणि टिम डेविड यांना पूर्णपणे फिट नसतानाही त्यांच्यावर भरवसा दाखवण्याचे संकेत मिळत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कमिन्सची फिटनेस चाचणी होणार
पॅट कमिन्सच्या कंबरेचा (BACK) स्कॅन होणार असून, त्यानंतरच त्याच्या वर्ल्ड कपमधील सहभागावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
कमिन्सने जुलै २०२५ नंतर फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. त्यानंतर त्याने अॅशेस मालिकेतून माघार घेतली होती. मात्र तो सध्या संघासोबत प्रवास करत आहे.
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
काय म्हणाले प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड?
ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले आहेत की, पॅटचा स्कॅन पुढील चार आठवड्यांत होईल. त्यानंतरच तो वर्ल्ड कपसाठी उपलब्ध आहे की नाही, हे स्पष्ट होईल. २ जानेवारीपूर्वी १५ सदस्यांचा संघ जाहीर करायचा आहे. जोश हेजलवूड सध्या स्नायू दुखापतीच्या समस्येमुळे संघाबाहेर आहे. मात्र तोही टी २० वर्ल्ड कपससाठी पूर्णपणे फिट होईल, असे वाटते. BBL मध्ये दुखापग्रस्त झालेल्या टिम डेविडही संघात असेल आणि तोही वर्ल्ड कप खेळले, असा विश्वास ऑस्ट्रेलियन कर्णधाराने व्यक्त केला आहे.
तिन्ही मॅच विनर खेळाडू, पण...
भारत आणि श्रीलंकेच्या मैदानात खेळवण्यात येणारी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पॅट कमिन्स. टीम डेविड आणि जोश हेजलवूड हे तिन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू एकहाती सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता बाळगून आहेत. त्यामुळेच ते दुखापतग्रस्त असतानाही ऑस्ट्रेलियन संघ या तिघांसह संघ बांधणीचा विचार करत आहे. पण हाच डाव ऑस्ट्रेलियावरही फिरू शकतो. जर ते शंभर टक्के देऊ शकले नाहीत तर ऑस्ट्रेलियाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.