Join us

Ind vs Aus: ‘पंतमुळे फलंदाजी लवचिक होईल, शॉ ऐवजी गिलला खेळवा’

यष्टिरक्षक म्हणून रिद्धिमान साहाऐवजी आक्रमक ऋषभ पंत याला तसेच सलामीवीर म्हणून मयांक अग्रवालचा सहकारी या नात्याने पृथ्वी शाॅऐवजी शुभमान गिल याला संधी द्यायला हवी, अशी सूचना माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:59 IST

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत यष्टिरक्षक म्हणून रिद्धिमान साहाऐवजी आक्रमक ऋषभ पंत याला तसेच सलामीवीर म्हणून मयांक अग्रवालचा सहकारी या नात्याने पृथ्वी शाॅऐवजी शुभमान गिल याला संधी द्यायला हवी, अशी सूचना माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला केली आहे.कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद दहा हजार धावांचा टप्पा गाठणारे गावसकर यांनी आक्रमक पंतचा संघातील समावेश फलंदाजीला लवचिकता प्रदान करेल, असे सांगून ते पुढे म्हणाले, ‘पंतने गुलाबी चेंडूने खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात ७३ चेंडूत १०३ धावा ठोकल्या होत्या. चार वर्षांआधी ऋषभ पंत चारही कसोटी सामने खेळला होता. त्याने एक शतक झळकावले शिवाय यष्टीमागे चांगली कामगिरी केली होती. काही दिवसांआधी पुन्हा त्याने शतक ठोकले, हे संघ व्यवस्थापनाला प्रभावित करणारे ठरू शकते.यष्टिरक्षणात तांत्रिकदृष्ट्या सरस असलेल्या साहाऐवजी माझी पसंती पंतला असेल, कारण ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर यष्टिरक्षणात आव्हान नाही. ज्या खेळपट्ट्यांवर चेंडू वळण घेतो तेथे सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षकाची गरज असते. अशावेळी साहा प्रथम पसंती ठरू शकतो, असेही ते म्हणाले.

टॅग्स :रिषभ पंतवृद्धिमान साहाशुभमन गिलपृथ्वी शॉ