Join us

ब्राव्होच्या गाण्यांवर धरला पंड्या बंधूनी ठेका

सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ चांगल्या फॉर्मात नाही. पण मैदानावरचा ताण दूर करण्यासाठी पंड्या बंधूंनी ब्राव्होच्या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 18:02 IST

Open in App
ठळक मुद्देसपना चौधरी या गायिकेच्या गाण्यावर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलच्या डान्सचा व्हीडीओ तर चांगलाच वायरल झाला होता.

मुंबई : सध्या आयपीएलमधल्या क्रिकेटपटूंच्या डान्सचे व्हीडीओ आपण समाजमाध्यमांवर पाहत आहोत. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या ड्वेन ब्राव्होच्या गाण्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने डान्स केला होता. त्यानंतर सपना चौधरी या गायिकेच्या गाण्यावर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलच्या डान्सचा व्हीडीओ तर चांगलाच वायरल झाला होता. आता तर मुंबई इंडियन्सच्या हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधूंच्या डान्सचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर लोकांना भावतो आहे.

सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ चांगल्या फॉर्मात नाही. पण मैदानावरचा ताण दूर करण्यासाठी पंड्या बंधूंनी ब्राव्होच्या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हीडीओ पोस्ट केला आहे. या व्हीडीओमध्ये ब्राव्होच्या 'रन दी वर्ल्ड' या इंग्रजी गाण्यावर पंड्या बंधूनी डान्स केला आहे. 

गेलचा वायरल झालेला व्हीडीओ पाहा...

टॅग्स :आयपीएल 2018हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्स