Join us

VIDEO: बाबर पाठोपाठ नसीम शाह देखील इंग्रजीवरून ट्रोल; जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

पाकिस्तानी संघाचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह सध्या खूप चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 17:22 IST

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह सध्या खूप चर्चेत आहे. आशिया चषकात त्याने केलेल्या उल्लेखणीय कामगिरीमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. मात्र सध्या तो त्याच्या खराब इंग्रजीमुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) अर्थात पीएसएलमधील नसीम शाहचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामधून त्याच्या इंग्रजीची खिल्ली उडवली जात आहे. या व्हिडीओत क्रिकेटपटू मोहम्मद नवाज आणि नसीम शाह 'लेनोवो' शब्दाला योग्यरित्या बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, मोहम्मद नवाजने योग्यरित्या लेनोवो असा उल्लेख केला मात्र नसीम शाहची गडबड झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय चाहत्यांनी यावरून नसीम शाहच्या इंग्रजीची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल करून युवा गोलंदाजाला ट्रोल केले जात आहे. 

भारतीय चाहत्याने उडवली खिल्ली 

आशिया चषकात नसीम शाहने पदार्पण करून शानदार गोलंदाजी केली होती. तसेच अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात नसीमने सलग दोन षटकार ठोकून पाकिस्तानला निसटता विजय मिळवून दिला होता. आजपासून पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाकिस्तानच्या धरतीवर टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. 

पाकिस्तानी युजर्संनी भारतीय चाहत्याला दिले प्रत्युत्तर 

बाबर आझमही झाला होता ट्रोल 

 

टॅग्स :पाकिस्तानबाबर आजमट्रोलमिम्सइंग्रजी
Open in App