Join us

पाकिस्तानी अंपायरचं मन बघा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारांना स्वतःच्या हॉटेलमध्ये देतोय मोफत जेवण

कोरोना व्हायरसशी झगडण्यासाठी संपूर्ण जग एकजुटीनं काम करत आहे. सरकारच्या मदतीला अनेक संस्था, विविध क्षेत्रातील सेलिब्रेटींनीही पुढाकार घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 18:03 IST

Open in App

पाकिस्तानमध्येही कोरोना रुग्णांची संख्या 1000 वर गेली आहे. त्यामुळे तेथेही अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. याची झळ सामान्य जनतेला सोसावी लागत आहे. अनेकांचा रोजगार गेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी अशा गरजूंना जीवनावश्यक वस्तू पूरवत आहे. त्यात पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या करारबद्ध खेळाडूंनी सरकारच्या मदतीसाठी 50 लाखांचा निधी देण्याचे ठरवले आहे. यात आता पाकिस्तानी अंपायर अलीम दार यांनीही पुढाकार घेतला आहे. 

पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय अंपायर अलीम दार यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नोकरी गमवावी लागलेल्यांसाठी लाहोर येथील त्यांच्या हॉटेलमध्ये मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीम दार यांनी 386 आंतरराष्ट्रीय सामन्यांत अंपायरींग केली आहे. लाहोर येथे त्यांचं स्वतःचा Dar’s Delighto या नावाचं हॉटेल आहे.

''कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान माजवलं आहे आणि त्याची झळ पाकिस्तानलाही बसत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं या व्हायरसपासून वाचण्यासाठी सुरक्षिततेची काही उपाय सुचवली आहेत. कृपया करून त्याचे पालन करा,'' असे दार यांनी सांगितले.  ते म्हणाले,''आपल्या सर्वांच्या पाठिंब्याशिवाय हा व्हायरस रोखण्यात प्रयत्नशील असलेल्या सरकारला यश येणार नाही. लोकांना विनंती आहे की नियमांचे पालन करा. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली. अशा लोकांसाठी मी माझ्या हॉटेलमध्ये मोफत जेवण देत आहे.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मोठ्या मनाचा माणूस; दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर अन् त्याच्या पत्नीची कोट्यवधींची मदत 

Shocking : आफ्रिकेच्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

क्रीडा विश्व धावलं मदतीला, पण क्रिकेटचा देव अन् कॅप्टन कोहली करताहेत फक्त आवाहन!

श्रीलंका, बांगलादेश अन् आता पाकिस्तान क्रिकेट मंडळानंही दिला मदतीचा हात; BCCI पुढाकार कधी घेणार?

Video : शोएब अख्तर देतोय कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी बाबा रामदेव यांच्या टिप्स

ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची दोन राज्यांना आर्थिक मदत

केदार जाधवचं पुण्याचं काम; वाढदिवसाला केलं गरजू व्यक्तीसाठी रक्तदान

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यापाकिस्तान