केदार जाधवचं पुण्याचं काम; वाढदिवसाला केलं गरजू व्यक्तीसाठी रक्तदान

भारतीय संघाचा फलंदाज केदार जाधव आज 35 वर्षांचा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 05:22 PM2020-03-26T17:22:16+5:302020-03-26T18:53:52+5:30

whatsapp join usJoin us
Kedar Jadhav wins hearts on 35th birthday by donating blood to a man in need svg | केदार जाधवचं पुण्याचं काम; वाढदिवसाला केलं गरजू व्यक्तीसाठी रक्तदान

केदार जाधवचं पुण्याचं काम; वाढदिवसाला केलं गरजू व्यक्तीसाठी रक्तदान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा फलंदाज केदार जाधव आज 35 वर्षांचा झाला. भारताच्या फलंदाजानं गतवर्षी पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे प्रतिनिधित्वही केलं होतं. सध्या त्याचं वन डे संघातील स्थान डळमळीत झाले आहे. पण, केदारनं गुरुवारी त्याच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली. केदारनं त्याच्या वाढदिवशी एका गरजू व्यक्तीला रक्तदान केले.  

चेन्नई सुपर किंग्सने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सराव सत्र रद्द केल्यानंतर केदार पुण्यात त्याच्या घरीच आहे. इंडियन प्रीमिअर लीग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे घरी असलेल्या केदारनं समाजकार्य केलं आहे. एका समाजसेवी संस्थेनं त्याच्या रक्तदान करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यानंतर केदारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  


 केदारने 73 वन डे सामन्यातं टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना 42.09 च्या सरासरीनं 1389 धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याच्या नावावर 27 विकेट्स आहेत.  ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 9 सामन्यांत 122 धावा केल्या आहेत. 99 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. 
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मोठ्या मनाचा माणूस; दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर अन् त्याच्या पत्नीची कोट्यवधींची मदत 

Shocking : आफ्रिकेच्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

क्रीडा विश्व धावलं मदतीला, पण क्रिकेटचा देव अन् कॅप्टन कोहली करताहेत फक्त आवाहन!

श्रीलंका, बांगलादेश अन् आता पाकिस्तान क्रिकेट मंडळानंही दिला मदतीचा हात; BCCI पुढाकार कधी घेणार?

Video : शोएब अख्तर देतोय कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी बाबा रामदेव यांच्या टिप्स

ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची दोन राज्यांना आर्थिक मदत

Web Title: Kedar Jadhav wins hearts on 35th birthday by donating blood to a man in need svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.