Join us

पाकिस्तानी पत्रकार झैनाब अब्बासची भारतातून हकालपट्टी; हिंदू देवी-देवतांचा केला होता अपमान

१२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 15:34 IST

Open in App

icc World Cup 2023 : तब्बल १२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. जगभरातील दहा संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानी संघ देखील सात वर्षांनंतर भारतात आला आहे. पाक संघासोबत तेथील काही नामांकित पत्रकारांना देखील भारताचा व्हिसा मिळाला. पण, पाकिस्तानी महिला पत्रकार झैनाब अब्बास हिची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ती आयसीसी विश्वचषक २०२३ चे अँकरिंग करण्यासाठी आली होती. 

खरं तर झैनाब अब्बास हिने हिंदू देवतांचा अपमान केल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. झैनाब सध्या दुबईत असल्याचे कळते. भारतीय वकील विनीत जिंदाल यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर झैनाब अब्बासवर ही कारवाई करण्यात आली. ही तक्रार जैनाबच्या जुन्या पोस्टशी संबंधित होती, ज्यात तिने हिंदू देव-देवतांच्या विरोधात बरेच काही लिहिले होते. तक्रारदार भारतीय वकिलाच्या म्हणण्यानुसार, झैनाबने नऊ वर्षांपूर्वी ही पोस्ट 'Zainablovesrk' या नावाने केली होती, जे अकाउंट नंतर तिने 'ZAbbas official' असे बदलले. 

झैनाब अब्बासची भारतातून हकालपट्टीपाकिस्तानी पत्रकार झैनाब अब्बासविरोधात दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. हिंदू धर्माचा अपमान केल्याबद्दल तिच्यावर IPC ची कलम १५३ए, २९५, ५०६आणि १२१ लावण्यात आली आहेत. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानमहिलापत्रकारभारत