Join us

Shaun Tait: "हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला...", PAK क्रिकेटरचे शॉन टेटबद्दलचे ट्विट अन् चाहते संभ्रमात

शुक्रवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामधील वन डे मालिकेचा अखेरचा सामना पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 15:43 IST

Open in App

नवी दिल्ली : शुक्रवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील वन डे मालिकेचा अखेरचा सामना पार पडला. पाहुण्या किवी संघाने अखेरचा सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजय मिळवून यजमानांना पराभवाची धूळ चारली. वन डे मालिका गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद चिघळला आहे. अशातच पाकिस्तानी क्रिकेटर शाहनवाज दहानीचे एक ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. शाहनवाज दहानीने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटचे फोटो शेअर केले आणि कॅप्शन लिहिले. शहानवाज दहानीने लिहिले की, "हसू  आणणारा मित्र काल रात्री अश्रू देऊन निघून गेला", दहाणीचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. 

शाहनवाज दहानी ट्रोल दरम्यान, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका संपल्यानंतर शॉन टेट ब्रेक दरम्यान आपल्या घरी म्हणजेच ऑस्ट्रेलियाला परतत होता. अशातच शाहनवाज दहानीने या आशयाचे कॅप्शन लिहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी त्याला ट्रोल केले. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर शाहनवाज दहानीने आणखी एक ट्विट केले आणि म्हटले की, "अरे भाई, मी पाकिस्तान क्रिकेट संघाबद्दल बोलत आहे."

...अन् चाहते संभ्रमात चाहत्यांनी लिहिले की, कॅप्शन वाचल्यानंतर पहिल्या क्षणी असे दिसते की शॉन टेटचे निधन झाले आहे. अनेक चाहत्यांनी पुनरुच्चार केला की आम्हाला वाटले की त्यांचे निधन झाले आहे. लोकांनी लिहिले की, कसले कॅप्शन लिहिले आहे, आम्ही घाबरलो. काही लोकांनी स्वत: ट्विटबद्दल समजावून सांगितले आणि शॉन टेट ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असल्याचे म्हटले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :पाकिस्तानऑफ द फिल्डन्यूझीलंडआॅस्ट्रेलियाट्रोल
Open in App