Fatima Sana Khan Not Attend Opening Ceremony And Photoshoot Of Women's World Cup 2025 : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबरपासून महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली नौटंकी सुरु केली आहे. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या सामन्यापासून दूर राहण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील सलामीच्या लढतीआधी गुवाहटीच्या मैदानात भारतीय लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल हिच्या संगीत मैफलीत हा सोहळा पार पडणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिया कप स्पर्धेत भारत-पाक सामन्यासंदर्भात चर्चा, त्यात पाक क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
पाकिस्तानी जियो वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी महिला क्रिकेट संघ महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नाही. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण वातावरण आणखी वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतल्याचा उल्लेख वृत्तामध्ये करण्यात आला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, असा सूर उमटत असताना महिला वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.
कॉलेजमधली एक भेट, फेसबुकवर मेसेज अन् मग...; संजू सॅमसनला असा मिळाला 'आयुष्याचा जोडीदार'
पाक कॅप्टनला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यासही राजी नाही पाकिस्तान
वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी सर्व संघाचे कॅप्टन ओपनिंग सरेमनीमध्ये सहभागी होणे अपेक्षित असते. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाच्या कॅप्टनला या कार्यक्रमासह फोटोशूटसाठी भारतात पाठवायचं नाही, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाही दोन्ही पैकी एकाही गोष्टीसाठी भारतात येणार नाही.
पाकिस्तानच्या सर्व लढती श्रीलंकेत, त्यांनी फायनल गाठली तर काय?
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानी महिला संघाचे सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर नियोजित आहेत. या स्पर्धेतील फायनल सामना नवी मुंबईत खेळवला जाणार आहे. पण जर पाकिस्तानचा संघ फायनलसाठी पात्र ठरला तर मात्र हे नियोजनही बदलावे लागणार आहे.
Web Title: Pakistan Women Cricket Team To Boycott Pak Captain Fatima Sana Khan Not Attend Opening Ceremony Or Photoshoot Of ICC Women's Cricket World Cup 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.