Join us

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 538 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 164 धावांवर आटोपला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 15:36 IST

Open in App
ठळक मुद्देया विजयासह पाकिस्तानने दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली आहे.

अबुधाबी : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर 373 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 538 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 164 धावांवर आटोपला. या विजयासह पाकिस्तानने दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली आहे.

पाकिस्तानने आपला दुसरा डाव 9 बाद 400 या धावसंख्येवर घोषित केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 538 धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचे पाकिस्तानचा वेगवान गोलंदज मोहम्मद अब्बासने कंबरडे मोडले. अब्बासने यावेळी पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया