Babar Azam Registered 3 Ducks In Last 6 T20I : पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानात झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या तिरंगी टी-२० मालिका खेळत आहे. रावळपिंडीच्या मैदानातील पाकिस्तान-झिम्बाब्वे यांच्यातील लढतीनं या मालिकेची सुरुवात झाली. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 'बब्बर शेर' बाबर आझम पुन्हा एकदा खातेही न उघडता तंबूत परतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुन्हा पदरी पडला भोपळा अन् सेल्फिशचा टॅगही लागला
ब्रॅड एव्हान्स याच्या अगदी सामान्य चेंडूवर बाबर आझम स्टंपसमोर आडवा येऊन फसला. झिम्बाब्वेच्या संघाने अपील करताच मैदानातील पंचांनी अपील केली आणि पंचांनी बाबरला बाद ठरवले. आपली विकेट वाचवण्यासाठी बाबर आझमनं रिव्ह्यू घेतला. अंपायर कॉलमुळे रिव्ह्यू वाचला, पण बाबर आझमला मात्र तंबूचा रस्ता धरावा लागला. मागील ६ टी-२० सामन्यात तिसऱ्यांदा बाबर आझम शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. झिम्बाब्वेविरुद्ध ही वेळ आल्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. त्यात DRS घेतल्यामुळे त्याला सेल्फिशचा टॅगही लागला आहे. कारण मागील १६ सामन्यात प्रत्येक वेळी विकेट वाचवण्यासाठी त्याने अयशस्वी रिव्ह्यू घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा तिसरा पाकिस्तानी बॅटर
बाबर आझम हा आतापर्यंतच्या आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत ९ व्या वेळी शून्यावर बाद झाला आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. सइम अयूब आणि उमर अकमल हे सर्वाधिक १० वेळा शून्यावर बाद झाल्याचा रेकॉर्ड आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत शतकी खेळी, टी-२० मध्ये पुन्हा अपयश
तिरंगी टी-२० मालिकेआधी पाकिस्तानच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाक संघाने श्रीलंकेला ३-० असे पराभूत केले. एवढेच नाही या मालिकेत बाबर आझमच्या भात्यातून एक शतकही आले. पण टी-२० मध्ये पुन्हा एकदा तो फुसका बार ठरला. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २९ धावांची खेळी केल्यावर दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद १०२ धावांची खेळी केली. पण त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो ५० पेक्षा अधिक चेंडूचा सामना करुन ३४ धावांवर बाद झाला. ही आकडेवारी त्याच्या सातत्याचा अभाव आणि आत्मविश्वासाची कमी असल्याचा पुरावाच आहे.