Pakistan vs Sri Lanka, T20 World Cup 2026 Super 8 Live Streaming Details : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या यंदाच्या हंगामातील सुपर ८ फेरीत ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. इंग्लंडपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमीच तिकीट मिळवलं असून उर्वरित दोन जागेसाठी अजूनही चार संघ शर्यतीत आहेत. पहिल्या गटात भारत-वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी नॉकआउटचा सामना रंगणार आहे. याआधी श्रीलंकेतील पल्लेकेलेच्या मैदानात रंगणाऱ्या श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर तिसरा सेमीफायलिस्ट कोण ते चित्र स्पष्ट होणार आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
तिसरा सेमीफायलिस्ट ठरवणारा सामना! पाकचा रेकॉर्ड भारी, पण...
श्रीलंकेचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पण पाकिस्तान संघाची या सामन्यातील विजयासह सेमीची आस कायम आहे. पाकिस्तान- श्रीलंका यांच्यात आतापर्यंत २४ टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. यात १४ सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली असून १० सामने श्रीलंकेनं जिंकले आहेत. पाकिस्तानचा रेकॉर्ड भारी असला तरी श्रीलंकेविरुद्धचा सामना उत्तम धावगतीसह जिंकण्याचे मोठे आव्हान पाकिस्तानसमोर आहे. जर ते शक्य झालं तरच न्यूझीलंडला खाली खेचून ते सेमीच्या शर्यतीत टिकू शकतील.
कोण आहे Rehan Ahmed? इंग्लंडच्या खेळाडूचं पाकिस्तानशी खास कनेक्शन; तो भारतासाठीही ठरु शकतो डोकेदुखी
कधी अन् कुठं रंगणार PAK vs SL यांच्यातील सामना?
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. शनिवारी २८ फेब्रुवारीला सुपर ८ फेरतील दुसऱ्या गटातील हा सामना सायंकाळी ७ वाजता सुरु होईल. अर्धातास अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.
हवामान अंदाज पाकिस्तानला मोठा दिलासा देणारा
पाकिस्तानचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली होती. श्रीलंकेविरुद्ध तसे झाले तर पाकिस्तान स्पर्धेबाहेर होऊ शकतो. पण हवामान खात्याचा अंदाज पाकिस्तानला दिलासा देणारा आहे. सामन्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही. कँडीतील पल्लेकेलेतील तापमान २४ ते २० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज असून आर्द्रता सुमारे ७० टक्के असेल. त्यामुळे सामन्यात कोणताही अडथळा येणार नाही.
खेळपट्टी कुणाला देईल साथ?
पल्लेकेलेची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. इथं चेंडूला चांगली उसळी आणि गती मिळते. संध्याकाळी दव पडण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजांना समस्या उद्भवू शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ धावांचा पाठलाग करण्याला पसंती देऊ शकतो.
श्रीलंका संभाव्य प्लेइंग इलेव्हन
पथुम निसंका, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), कमिंदू मेंडिस, चरिथ असलंका, दासुन शनाका, जनिथ लियानागे, दुनिथ वेल्लालागे, दुषण हेमंथा, महिश तीक्षणा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन :
साहिबजादा फरहान, सईम अयूब, बाबर आझम, फखर झमान, उस्मान खान, शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान तारीक, सलमान मिर्झा.
कुठे अन् कसा पाहता येईल हा सामना?
भारतामध्ये हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाईटवरही चाहत्यांना या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असेल.