Pakistan vs Sri Lanka Live Marathi : आशिया चषक स्पर्धेतील श्रीलंका-पाकिस्तान यांच्यातला सामना हा उपांत्य फेरीसारखाच आहे. जो संघ जिंकेल, तो फायनल खेळेल. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी आज चांगली सुरुवात करताना पाकिस्तानचा निम्मा संघ १३० धावांत तंबूत पाठवला होता. मोहम्मद रिझवान व इफ्तिखार अहमद यांनी १०८ धावांची भागीदारी केली अन् चित्र बदलले. पाकिस्तानने ४२ षटकांत ७ बाद २५२ धावा केल्या आहेत आणि श्रीलंकेला विजयासाठी २५२ धावाच कराव्या लागणार आहेत.
फखर जमान ( ४) अपयशी ठरल्यानंतर बाबर आजम ( २९)ने अब्दुल्लाह शफिकसह ६४ धावांची भागीदारी केली. शफिकने ५२ धावांची खेळी करून त्याची निवड योग्य ठरवली. पण, दुसऱ्या बाजूने विकेट्स पडल्या अन् ५ बाद १३० अशी पाकिस्तानची अवस्था झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे ४५-४५ षटकांचा हा सामना ४२-४२ षटकांचा खेळवण्याचे ठरले. मोहम्मद रिझवानला दिलेलं जीवदान महागात पडले. रिझवान ७३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ८६ धावांवर नाबाद राहिला. इफ्तिखार ४० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांवर झेलबाद झाला. पाकिस्तानने ४२ षटकांत ७ बाद २५२ धावा केल्या. मथिषा पथिराणाने ३ अन् प्रमोद मदुशाने २ विकेट्स घेतल्या.
![]()
जाणून घेऊया गणित...
पाकिस्तानने शेवटच्या १० षटकांत १०२ धावा चोपल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे येथे DLS अर्थात डकवर्थ लुईस नियम लागू झाला अन् त्यानुसार श्रीलंकेसमोर ४२ षटकांत २५२ धावांचे लक्ष्य ठेवले गेले.