Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...

Pakistan vs Oman मॅच कधी अन् कुठल्या मैदानात रंगणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 02:06 IST2025-09-12T01:55:37+5:302025-09-12T02:06:36+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan vs Oman Head to Head T20 Stats And Records When And Where Can You Watch Asia Cup 2025 Pakistan vs Oman 4th Match | Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...

Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2025, Pakistan vs Oman Head to Head Records : पाकिस्तान विरुद्ध ओमान यांच्यात आशिया चषक २०२५ स्पर्धेतील चौथा सामना खेळवण्यात येणार आहे. गत हंगामातील उप विजेत्या पाक संघासमोर पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेत उतरणाऱ्या ओमान संघाची डाळ शिजणं तसं मुश्किलच आहे. पण सामन्याचा निकालापेक्षा हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरेल. कारण पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात हे दोन संघ समोरासमोर येतील. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

Pakistan vs Oman मॅच कधी अन् कुठल्या मैदानात रंगणार?

आशिया चषक २०२५ स्पर्धेतील 'अ' गटातील पाकिस्तान आणि ओमान यांच्यातील पहिला अधिकृत टी२० सामना हा १२ सप्टेंबरला दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री ८ वाजता ही लढत सुरु होईल. भारत अन् यूएई यांच्यातील लढतीनंतर 'अ' गटातील हा दुसरा सामना आहे. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत स्टार खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणार आहे. सलमान आगा हा पाक संघाचे नेतृत्व करताना दिसेल. दुसऱ्या बाजूला ओमानच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही जतिंदर सिंग या मूळच्या पंजाबी असलेल्या गड्याच्या खांद्यावर असेल.

Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...

दोन्ही संघात एक लढत झालीये, त्यात पाकनं मारलीये बाजी

पाकिस्तान विरुद्ध ओमान यांचा टी-२० सामन्यांमधील अधिकृत हेड-टू-हेड सामना आशिया कप २०२५ पासून सुरू होईल. मात्र, याआधी झालेल्या एमर्जिंग आशिया चषक २०२४ स्पर्धेतील एकमेव लढतीत पाक संघाने बाजी मारली होती. या सामन्यात पाकच्या शाहीन संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना १८५ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ओमानचा संघ निर्धारित २० षटकात फक्त १११ धावांपर्यंत मजल मारू शकला होता. 

या खेळाडूंवर असेल ओमानची मदार

पाकिस्तान संघ हा बॅटिंग-बॉलिंग दोन्हींत मजबूत आहे. दुसरीकडे ओमान या नवख्या संघाला भारतीय वंशाचा कर्णधार जतिंदर सिंगसह अकिब इल्यास आणि बिलाल खान यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. जतिंदरनं आतापर्यंत ६४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १३९९ धावा काढल्या आहेत. अकिब हा अष्टपैलू खेळाडू आहे. तर गोलंदाजीत ११० विकेट्स खात्यात असलेल्या बिलाल खान कमाल दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.

टेलिव्हिजनसह Live स्ट्रीमिंगसह कसा घेता येईल या सामन्याचा आनंद?

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून Pakistan vs Oman यांच्यातील लढतीचं थेट प्रेक्षपण करण्यात येईल. ऑनलाइन Live स्ट्रीमिंगसाठी सोनी Liv ॲप किंवा या वेबसाइटच्या माध्यमातून मोबाइलवर हा सामना पाहता येईल. लोकमत.डॉट कॉमच्या माध्यमातूनही आम्ही सामन्यासंदर्भातील अपडेट्स देणार आहोत. 

 

Web Title: Pakistan vs Oman Head to Head T20 Stats And Records When And Where Can You Watch Asia Cup 2025 Pakistan vs Oman 4th Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.