आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत आज पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पल्लेकेले येथे अटीतटीचा सामना रंगणार आहे. २०२२ च्या विश्वचषकाचे हे दोन्ही फायनलिस्ट पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पाकिस्तानचा सुपर-८ मधील न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना केवळ १ गुण मिळाला आहे. अशा स्थितीत आजचा इंग्लंडविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!T20 World Cup: ... तर वेस्ट इंडिज सेमीमध्ये आणि भारत बाहेर; रनरेट लागू होण्यापूर्वी भारत, दक्षिण आफ्रिकेला हे करावेच लागेल
जर आज पाकिस्तानचा इंग्लंडकडून पराभव झाला, तर त्यांचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे भवितव्य धोक्यात येईल. इंग्लंड ४ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचून सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. अशा वेळी दुसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात चुरस निर्माण होईल.
इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानला खालील गोष्टींवर अवलंबून राहावे लागेल:१. पाकिस्तानला २८ फेब्रुवारीला होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. यामुळे त्यांचे ३ गुण होतील.२. इतर संघांचे निकाल: पाकिस्तानला अशी प्रार्थना करावी लागेल की इंग्लंडने त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवावे. तसेच श्रीलंकेनेही न्यूझीलंडवर मात करावी.३. न्यूझीलंडचे गुण: जर न्यूझीलंडने त्यांचे उर्वरित सामने गमावले, तर त्यांचे गुण १ वरच राहतील. श्रीलंकेचे २ गुण होतील आणि पाकिस्तान ३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहून सेमीफायनल गाठू शकेल.
मात्र, या सर्व परिस्थितीमध्ये पाकिस्तानचे नशीब इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. त्यामुळे आजचा विजय पाकिस्तानसाठी 'करो या मरो' असाच आहे.
Web Summary : Pakistan faces England in a crucial T20 World Cup match. A loss jeopardizes their semifinal hopes, making victory essential. Pakistan's fate depends on winning against Sri Lanka and other teams' results, especially England beating New Zealand. It's a do-or-die situation.
Web Summary : पाकिस्तान का टी20 विश्व कप में इंग्लैंड से महत्वपूर्ण मुकाबला। हार से सेमीफाइनल की उम्मीदें खतरे में पड़ जाएंगी, जीत जरूरी। पाकिस्तान का भाग्य श्रीलंका के खिलाफ जीत और अन्य टीमों के परिणामों, खासकर इंग्लैंड द्वारा न्यूजीलैंड को हराने पर निर्भर करता है। करो या मरो की स्थिति है।