आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत आज पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पल्लेकेले येथे अटीतटीचा सामना रंगणार आहे. २०२२ च्या विश्वचषकाचे हे दोन्ही फायनलिस्ट पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पाकिस्तानचा सुपर-८ मधील न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना केवळ १ गुण मिळाला आहे. अशा स्थितीत आजचा इंग्लंडविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
T20 World Cup: ... तर वेस्ट इंडिज सेमीमध्ये आणि भारत बाहेर; रनरेट लागू होण्यापूर्वी भारत, दक्षिण आफ्रिकेला हे करावेच लागेल
जर आज पाकिस्तानचा इंग्लंडकडून पराभव झाला, तर त्यांचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे भवितव्य धोक्यात येईल. इंग्लंड ४ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचून सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. अशा वेळी दुसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात चुरस निर्माण होईल.
इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानला खालील गोष्टींवर अवलंबून राहावे लागेल:
१. पाकिस्तानला २८ फेब्रुवारीला होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. यामुळे त्यांचे ३ गुण होतील.
२. इतर संघांचे निकाल: पाकिस्तानला अशी प्रार्थना करावी लागेल की इंग्लंडने त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवावे. तसेच श्रीलंकेनेही न्यूझीलंडवर मात करावी.
३. न्यूझीलंडचे गुण: जर न्यूझीलंडने त्यांचे उर्वरित सामने गमावले, तर त्यांचे गुण १ वरच राहतील. श्रीलंकेचे २ गुण होतील आणि पाकिस्तान ३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहून सेमीफायनल गाठू शकेल.
मात्र, या सर्व परिस्थितीमध्ये पाकिस्तानचे नशीब इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. त्यामुळे आजचा विजय पाकिस्तानसाठी 'करो या मरो' असाच आहे.