Join us  

Pakistan: अपमानाच्या आगीत जळतोय पाक; क्रिकेटच्या मैदानावर आता तीन दुश्मन! म्हणे, बदला घेणार 

Pakistan want to take revenge on India, England, New Zealand: भारताने गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानसोबत सामने खेळणे बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड भिकेला लागला आहे. कारण सर्वात जास्त जाहिराती, प्रेक्षक आणि पैसा भारतासोबत लढल्यावरच मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 3:08 PM

Open in App

लाहोर: देशासारखाच भिकेला लागलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) पैसे कमविण्यासाठी 2019 मध्ये आशेचा किरण दिसला होता. श्रीलंकेसोबत तीन वनडे, तीन टी-२० आणि दोन टेस्ट खेळण्यात येणार होत्या. मात्र, पुन्हा एकदा पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. एकाच आठवड्यात दोन देशांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान करत दौरे रद्द केले. या अपमानाचा बदला वर्ल्ड कपमध्ये घेण्याच्या आगीत आता पाकिस्तान जळू लागला आहे. (India, England, New zealand are three enemies on the cricket field: Ramiz Raja)

भारताने गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानसोबत सामने खेळणे बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड भिकेला लागला आहे. कारण सर्वात जास्त जाहिराती, प्रेक्षक आणि पैसा भारतासोबत लढल्यावरच मिळतो. त्यातच 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेला दहशतवादी हल्ला, यामुळे अन्य संघांनीही पाकिस्तानात सामने खेळण्यास नकार दिला होता. तेव्हापासून पाकिस्तानची हालत बेकार झाली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात न्युझीलंड संघाने मालिका सुरु होण्याच्या तोंडावरच दौरा रद्द केला आणि त्यानंतर इंग्लंडने देखील पाकिस्तानात येण्यास नकार देत जखमेवर मीठ चोळले आहे. 

यामुळे पाकिस्तान भडकला आहे. या देशांना त्यांच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या टीमवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा दिला होता. आता या साऱ्या प्रकारानंतर पीसीबी बोर्डाचा अध्यक्ष रमीझ राजा ने संताप व्यक्त केला आहे. त्याने 4 मिनिटे आणि 57 सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट केला असून भारताचे नाव न घेताच न्यूझीलंड, इंग्लंड या संघांशी बदला घेण्याचा इशारा दिला आहे. 

रमीझ राजा म्हणतो की, मी इंग्लंडच्या माघार घेण्याने निराश आहे, पण हे अपेक्षित होते. कारण पश्चिमी देश एकजूट होतात आणि एकमेकांचे समर्थन करतात. तुम्ही सुरक्षेतील धोका आणि धारणेच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ शकता. आधी न्यूझीलंड नंतर इंग्लंडने नकार दिल्याने संतापाची भावना होती. 

हा आमच्यासाठी एक धडा आहे. आम्ही जेव्हा त्यांच्या देशात जातो तेव्हा आम्हाला कडक क्वारंटाईन पाळावे लागते. त्यांचे आगाऊ सल्ले सहन करतो. आता आम्ही देखील तेवढेच पुढे जाऊ, जेवढे आमच्या हिताचे असेल. पीसीबी ही पोकळी भरून काढण्यासाठी झिम्बाब्बे, श्रीलंका आणि बांग्लादेशसी चर्चा करत आहे. मात्र, यात प्रवासाची समस्या येऊ शकते. आम्ही विश्वचषकात जाऊ आणि आता आमच्या निशाण्यावर भारतासह न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोघेही असतील. आम्ही याचा बदला मैदानात घेऊ, अशी धमकी रमीझ राजाने दिली आहे.

टॅग्स :पाकिस्तानदहशतवादभारतइंग्लंडन्यूझीलंड
Open in App