T20 World Cup Final Pakistan vs England : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा ( Ramiz Raja) यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलपूर्वी पाकिस्तानी खेळाडूंची भेट घेतली.  १९९२ मध्ये पाकिस्तानने वन डे वर्ल्ड कप जिंकला होता आणि त्यावेळी जसे घडले होते, तसाच प्रवास पाकिस्तानचा याही वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत राहिला आहे. रमीझ राजा यांनी यावेळी खेळाडूंन १९९२च्या आठवणी सांगितल्या. पण, त्याचवेळी त्यांनी पाकिस्तानला टोमणा मारण्याची संधी सोडली नाही. भारतीय संघ उपांत्य फेरीत इंग्लंडकडून हरला. आता पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड अशी फायनल होणार आहे.
''पाकिस्तानी क्रिकेटपटू हे बिलियन डॉलर लीगच्या खेळाडूंपेक्षा चांगले आहेत, असा दावा राजा यांनी करून भारतीय खेळाडूंना हिणवले. पीसीबी प्रमुख म्हणाले, ''बिलियन डॉलरची इंडस्ट्री असलेले मागे राहिले आणि आम्ही त्यांच्या पुढे निघून गेलो.  
भारताची फायनल खेळण्याची त्यांची पात्रताच नाही - शोएब शोएब अख्तर म्हणाला, भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव... खूपच खराब खेळले आणि ते पराभवाचे हकदार होते. वर्ल्ड कप फायनल खेळण्याची त्यांची पात्रताच नाही. खूपच घाणेरडा खेळ केला भारताने. गोलंदाजांनी निराश केले. युजवेंद्र चहल असायला हवा होता, संघ निवडतानाच गोंधळ दिसला. आम्हाला फायनलमध्ये तुम्हाला भेटायला आवडले असते, परंतु आता ते शक्य नाही. आता असंच भेटायला या.  
शाहिद आफ्रिदीने उडवली खिल्ली 
पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने इंग्लंडच्या खेळीचे कौतुक करताना भारतीय संघावर निशाणा साधला आहे. "इंग्लंडची किती अविश्वसनीय कामगिरी आहे. उपांत्य फेरीचे रूपांतर एका सामान्य सामन्यामध्ये झाले. जबरदस्त फलंदाजी ज्याला भारतीय संघाकडे कोणतेच उत्तर नव्हते. शानदार फलंदाजी @AlexHales1 @josbuttler", अशा शब्दांत आफ्रिदीने इंग्लंडच्या सलामीवीरांचे कौतुक केले आहे.