Join us  

पाकिस्तानला घ्यावी लागली माघार; Asia Cup 2020 आयोजनाचा सोडला हट्ट! 

बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये भारतीय संघ पाठवण्यास सक्त मनाई केली. त्यामुळे पाकिस्तानचे यजमानपद जाणार हे निश्चित होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 6:46 PM

Open in App

कराची : Asia cup 2020 स्पर्धेचे आयोजन आम्हीच करणार असा दावा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ( PCB ) अखेर माघार घेतली.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) काही केल्या झुगारत नसल्याचे पाहून PCB ला आशिया कप आयोजन करणार नसल्याची घोषणा करावी लागली. आता ही स्पर्धा दुबईत होण्याची शक्यता आहे. 

मागील काही दिवसांपासून या स्पर्धेबाबत संभ्रम होते. बीसीसीआयनेपाकिस्तानमध्ये भारतीय संघ पाठवण्यास सक्त मनाई केली. त्यामुळे पाकिस्तानचे यजमानपद जाणार हे निश्चित होते. पण तरीही PCBने ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच होईल असे सांगितले होते. आज अखेरीस त्यांनीच ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी होईल हे जाहीर केले. 

PCB चे एहसान मणी म्हणाले की," आशिया कप आयोजनासाठी यजमानांना निधी दिला जातो. पण जर भारतीय संघ खेळणार नसेल तर आशियाई क्रिकेट परिषदेकडून आम्हाला पुरेसा निधी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे आम्ही आशिया कप तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेला ही स्पर्धा रद्द करावी लागू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत."

टॅग्स :बीसीसीआयपाकिस्तानएशिया कपदहशतवाद