Pakistan Mentor Sarfaraz Ahmed Big Statement vs U19 Team India : अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करत जेतेपद मिळवल्यावर पाकिस्तानच्या अंडर १९ संघाचा मेंटॉर सरफराज खान (Sarfaraz Ahmed) याने भारतीय संघातील खेळाडूंच्या मैदानातील वर्तनावर भाष्य करुन नवा वाद निर्माण केला आहे. भारतीय संघाविरुद्ध मी अनेक सामने खेळलो आहे. त्यावेळी भारतीय खेळाडू खिलाडूवृत्तीनं खेळायचे. पण आताच्या भारतीय संघात खिलाडूवृत्ती दिसत नाही, मैदानात जे घडलं ते सर्वांना पाहिले, अशा आशयाच्या वक्तव्य सरफराज अहमद याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले. त्याचे हे वक्तव्य अप्रत्यक्षरित्या भारतीय अंडर १९ संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि युवा स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशीवर निशाणा साधणारे आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय म्हणाला सरफराज अहमद?
पाकचा माजी कर्णधार आणि अंडर १९ संघाचा विद्यमान मेंटॉरच सरफराज अहमद याने U19 आशिया कप स्पर्धेतील जेतेपदानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, “मी याआधीही भारतीय संघाविरुद्ध खेळलो आहे. तेव्हा भारतीय संघ खेळाचा सन्मान राखायचा. पण यावेळी बाहेरून पाहताना याउलट चित्र दिसले. भारतीय अंडर १९ संघातील खेळाडूंमध्ये खेळ भावनेचा अभाव दिसला. त्यांचे मैदानातील वर्तन खेळभावनेला धरून नव्हते. स्क्रीनवर तुम्ही पाहिलंच असेल की त्यांच्या खेळाडूंनी कशा प्रकारचे इशारे केले. आम्ही विजयाचा आनंद नेहमीप्रमाणे खेळभावनेत साजरा केला. क्रिकेटमध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे.
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
मैदानात जे दिसलं त्यामागची खरी गोष्ट
अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेसह सलामीवीर वैभव सूर्यवंशी यांची पाकिस्तानच्या ताफ्यातील अली रझाक या गोलंदाजासोबत शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. हाच दाखला देत सरफराज अहमदनं भारतीय खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. पण त्याने जे सांगितले ते अर्ध सत्य होते. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी विकेट गमावल्यावर पाकिस्तानच्या गोलंदाजावर राग काढला. पण त्यामागचं कारण त्याने भारतीय फलंदाजांना डिवचले होते. त्याने सुरुवात केली अन् शेवट भारतीय युवा खेळाडूंनी अगदी जशास तसे उत्तर देऊ केला. ही त्यामागची खरी स्टोरी आहे.
पाकच्या 'आळशी' कर्णधाराचा कळस!
पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद हा क्रिकेट फिल्डवरील सर्वात आळशी खेळाडूपैकी एक आहे. मॅच सुरु असताना जांभ्या देणारा हा क्रिकेटर आता पाकिस्तानच्या अंडर १९ संघाचा मेंटॉर झाला आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाने विजय मिळवला ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. पण त्याने जेतेपदानंतर आपल्या संघातील खेळाडूने केलेली चूक झाकून भारतीयांकडे दाखवलेले बोट हा तो मेंटॉरच्या लायकीचा आहे का? असा प्रश्न निर्माण करणारे आहे.