PAK vs SL T20 WC 2026 : तुला नाही जमणार; तू बाकावरच बस! शेवटी बाबरवर ती वेळ आलीच

पाकिस्तानच्या संघाने कुणावर दाखवला भरवसा?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 19:26 IST2026-02-28T19:23:37+5:302026-02-28T19:26:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Pakistan has left out star batter Babar Azam from its playing eleven for its crucial T20 World Cup 2026 Super Eight fixture against Sri Lanka | PAK vs SL T20 WC 2026 : तुला नाही जमणार; तू बाकावरच बस! शेवटी बाबरवर ती वेळ आलीच

PAK vs SL T20 WC 2026 : तुला नाही जमणार; तू बाकावरच बस! शेवटी बाबरवर ती वेळ आलीच

कँडी येथील पल्लेकेलेच्या मैदानात पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघ सुपर ८ फेरीतील आपला अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. श्रीलंकेचा संघ टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेबाहेर पडला आहे. दुसरीकडे पाकिस्तानसाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकून सेमीत एन्ट्री मारण्याची संधी आहे. हा डाव साधण्यासाठी पाकिस्तानच्या संघानं संघात मोठे बदल केले आहेत. कर्णधार सलामन अली आगाने सेमी फायनल गाठण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लढतीत मोठा निर्णय घेत बाबर आझमला बाकावर बसवले आहे. त्याच्यासोबत सईम अयूब आणि सलमान मिर्झा यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

पाकिस्तानच्या संघाने कुणावर दाखवला भरवसा?  

सेमीफायनलसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लढतीत पाकिस्तानच्या संघाने नसीम शाह, ख्वाजा नाफय आणि अब्रार अहमद यांना संधी दिली आहे. हा बदल पाकिस्तानला सेमीफायलमध्ये प्रवेश मिळून देणार का? ते पाहण्याजोगे असेल.

सलमान अली आगाची कॅप्टन्सी जाणार! बाबर आझमचं करिअर संपणार; मोहसीन नक्वी असा काढणार राग

बाबर आझमवर शेवटी बाकवर बसण्याची वेळ आलीच

बाबर आझम हा आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. याच जोरावर त्याला टी-२० वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या संघात स्थान मिळाले. मोठ्या स्पर्धेत त्याची आकडवारी खोटी ठरली. एकाही सामन्यात त्याला आपल्यातील धमक दाखवता आली नाही. धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबरचा स्ट्राईक रेटही चर्चेचा मुद्दा ठरला. याआधी प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊनही त्याला बॅटिंग ऑर्डरमध्ये खालच्या क्रमांकावर ढकलण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. आता सुपर ८ मधील शेवच्या सामन्यात त्याच्यावर बाकावर बसण्याची वेळ आली.   

Web Title : बाबर बाहर! पाकिस्तान ने टी20 विश्व कप मैच के लिए बदली रणनीति

Web Summary : टी20 विश्व कप सेमीफाइनल में पहुंचने के लिए पाकिस्तान ने श्रीलंका के खिलाफ महत्वपूर्ण मैच में बाबर आज़म को बाहर कर दिया। बाबर आज़म के स्थान पर नसीम शाह, ख्वाजा नाफे और अबरार अहमद को टीम में शामिल किया गया। यह निर्णय बाबर के फॉर्म और स्ट्राइक रेट के साथ संघर्ष के बाद लिया गया।

Web Title : Babar Benched! Pakistan Changes Strategy for Crucial T20 World Cup Match

Web Summary : Pakistan, needing a big win to reach the T20 World Cup semi-finals, surprisingly benched Babar Azam for their crucial match against Sri Lanka. Naseem Shah, Khwaja Nafay, and Abrar Ahmed were included in the team in place of Babar, Saiym Ayub and Salman Mirza. The decision followed Babar's struggles with form and strike rate.