पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि विकेट किपर बॅटर मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेतील पराभवानंतर चर्चेत आला आहे. टीम इंडियासंदर्भात त्याने जे वक्तव्य केले होते त्याचा दाखला देत नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. नेमकं काय प्रकरण? पाकिस्तानी खेळाडू टीम इंडियाविरुद्ध काय म्हणाला होता? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"सॉरी.. मी त्यांचे सामने पाहत नाही..." रिझवानचं टीम इंडियासंदर्भातील वक्तव्य पुन्हा चर्चेत
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान अनेक पाकिस्तानी खेळाडू भारतीय संघाच्या विरोधात 'बोलंदाजी' करताना दिसले. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात भारताने इंग्लंडला पराभूत केल्यावर या सामन्यासंदर्भात मोहम्मद रिझवान याला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने "सॉरी मी त्यांचा सामना पाहत नाही." असा रिप्लाय दिला होता. बांगलादेशच्या विरुद्धच्या वनडे मालिकेत पाकिस्तानसह रिझवान फुसका बार ठरल्यावर त्याच्या जुन्या वक्तव्याचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बांगलादेशकडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, पहिल्या वनडेत अवघ्या ९१ चेंडूत उडवला धुव्वा
रिझवानचा फ्लॉप शो!
टी-२० वर्ल्ड कपमधील लाजिरवाणी कामगिरीनंतर पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात मोठे बदल केले. परंतु शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील नव्या संघाची पहिल्या सामन्यातच फजिती झाली. रिझवान स्वतःही संघर्ष करताना दिसला; २० चेंडूत फक्त १० धावा करून माघारी परतला. त्याचा हा हा अनुभव आणि “टीम इंडियाचे सामने मी पाहत नाही” असा अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचा पराभव चर्चेत आहे.
सामन्यात काय घडलं?
मीरपूर येथील मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ३०.४ षटकांत अवघ्या ११४ धावांत आटोपला. बांगलादेशविरुद्धची त्यांची ही वनडेतील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. बांगलादशच्या ताफ्यातील युवा गोलंदाज नाहिद राणा याने २४ धावांत अर्धा संघ तंबूत धाडत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. त्याने मोहम्मद रिझवानसह साहिबजादा फरहान, शमील हुसैन, माज सदाकत आणि सलमान आगा यांना बाद केले. त्यानंतर बांगलादेशच्या संघाने ८ विकेट्स राखून ९१ चेंडूत हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
Web Summary : Mohammad Rizwan faces backlash after Pakistan's defeat to Bangladesh. His past comment, snubbing Team India resurfaces. Rizwan scored only 10 runs, adding to Pakistan's dismal performance, collapsing for 114. Bangladesh won by 8 wickets.
Web Summary : बांग्लादेश से पाकिस्तान की हार के बाद मोहम्मद रिज़वान आलोचना का सामना कर रहे हैं। उनका पुराना बयान, जिसमें उन्होंने टीम इंडिया को नकारा था, फिर से सामने आया है। रिज़वान ने सिर्फ 10 रन बनाए, जिससे पाकिस्तान का प्रदर्शन निराशाजनक रहा और टीम 114 रन पर सिमट गई। बांग्लादेश ने 8 विकेट से जीत हासिल की।