Join us

आधी बिस्कीट अन् आता लॉलिपॉप... पाकिस्तान क्रिकेट संघाची विनोद मालिका

पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी सध्या चांगलीच उंचावलेली पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 09:17 IST

Open in App

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी सध्या चांगलीच उंचावलेली पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. कसोटी पाठोपाठ त्यांनी ट्वेंटी-20 मालिकेत कांगारूंना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली हा संघ आता न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेप्रमाणे न्यूझीलंडविरुद्धच्या  मालिकेच्या चषकावरून पाकिस्तान संघावर सोशल मीडियावर विनोद सुरू झाले आहेत.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेच्या चषक अनावरण सोहळ्यातील फोटोने सोशल मीडियावर धम्माल विनोद फिरले होते. बिस्कीटाच्या आकाराच्या या चषकावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पाकिस्तान क्रिकेट मंडळाची खिल्ली उडवली होती. त्यात आणखी एका चषकाची भर पडली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतीच चषकाचे बुधवारी अनावरण करण्यात आले. हा चषक पाहून अनेकांना लॉलिपॉप आठवले आणि पाकिस्तान संघावरील विनोद मालिका सुरू झाली. 

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडआयसीसी