Join us
Daily Top 2Weekly Top 5

“कोणी पसंत करत असेल तर चांगलंच, पण माहित नाही उर्वशी कोण”

पाहा उर्वशीवर काय म्हणाला पाक क्रिकेटर नसीम शाह.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 18:06 IST

Open in App

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नाव सध्या पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहसोबत जोडले जात आहे. उर्वशी नुकतीच आशिया चषकात भारतासोबत पाकिस्तान संघाची मॅच पाहताना स्टेडियममध्ये दिसली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर नसीमचे नाव उर्वशीसोबत जोडले जात आहे.

पण या वृत्तांवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने आता पुढे येऊन आपली बाजूही मांडली आहे. तो उर्वशीला ओळखतही नसल्याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे. उर्वशी कोण आहे हेही त्याला माहीत नाही. “जर कोणी आपल्याला पसंत करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण आता क्रिकेट खेळण्याचा आपला प्लॅन आहे,” असं नसीम शाह म्हणाला. “असा कोणताही प्लॅन नाही. स्माईल कर तुमच्या प्रश्नावर येत आहे. कारण उर्वशी कोण हेच माहित नाही, काहीच कल्पना नाही. ती कोणते व्हिडीओ शेअर करते, काहीच माहीत नाही. असा माझा काही प्लॅन नाही. आता केवळ क्रिकेटवर लक्ष आहे. मला केवळ चांगंल क्रिकेट खेळायचं,” असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला.… तर चागंलंच आहे“खरं सांगायचं तर मला काही माहितच नाही. मी मैदानावर माझा खेळ खेळतो. मला काहीच कल्पना नाही. कोणी मला पसंत करत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. माझ्यासाठी येतात हीदेखील चांगली गोष्ट आहे. मी कोणता अवकाशातून अवतारलो आहे. माझा अंदाज काही निराळा नाही, परंतु लोक माझ्यावर प्रेम करतात ही चांगली बाब आहे,” असंही नसीम शाह म्हणाला.

टॅग्स :पाकिस्तानउर्वशी रौतेला
Open in App