Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पगारात २५० टक्क्यांनी वाढ, तरीही भारतीय क्रिकेटपटूंच्या तुलनेत मागेच!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) नवी अध्यक्ष रमीझ राजा यांनी खेळाडूंच्या पगारात २५० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 13:12 IST

Open in App

पाकिस्तान सध्या आर्थिक समस्येशी झगडत आहे आणि अशात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) नवी अध्यक्ष रमीझ राजा यांनी खेळाडूंच्या पगारात २५० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. याचा सर्वाधिक फायदा D गटातील खेळाडूंना होणार आहे. त्यांचा पगार आता ४० हजार पाकिस्तानी रुपये म्हणजे भारतीय रक्कमेत १७ हजार इतका होता आणि आता त्यांचा पगार १ लाखांच्या वर गेला आहे. आता त्यांना १ लाख ४० हजार पगार मिळणार आहे.  

नवीन अध्यक्ष रमीज राजा यांनी सर्व स्थानिक खेळाडूंच्या पगारात एक लाखांची वाढ केली. त्यामुळे १९२ स्थानिक क्रिकेटपटूंना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. त्याच्याशिवाय प्रथम श्रेणी व ग्रेड स्पर्धेतील क्रिकेटपटूंना १.४० लाख ते २.५० लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. ग्रेड A मधील खेळाडूंचा पगार १३.७५ लाखांवरून १४.७५ लाख, ग्रेड B मधील खेळाडूंचा पगार ९.३७ लाखांवरून १०.३७ लाख आणि ग्रेड C मधील खेळाडूंचा पगार ६.८७ लाखांवरून ७.८७ लाख इतका ( पाकिस्तानी रुपये) झाला आहे.

दुसरीकडे, भारतीय खेळाडूंचा पगार बघितला तर तो खूपच जास्त आहे. भारताच्या ए प्लस ग्रेडमधील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. ग्रेड ए मधील खेळाडूंना 5 कोटी, ग्रेड बी खेळाडूंना 3 कोटी आणि ग्रेड सी मधील खेळाडूंसाठी 1 कोटी रुपये वर्षाला पगार दिला जातो.  

टॅग्स :पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ
Open in App