Join us

पाकिस्तान क्रिकेटमध्ये राडा! बाबर आझमनंतर आता मोहम्मद रिझवानही कर्णधारपद सोडणार; कारण काय?

रिझवान लवकरच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी यांची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:31 IST

Open in App

Mohammad Rizwan, Pakistan Cricket Captain: मोहम्मद रिझवान पाकिस्तानच्या वनडे संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो. यासंदर्भात तो लवकरच पीसीबी अध्यक्षांची भेट घेणार आहे. यष्टिरक्षक-फलंदाज रिझवान २०२४ मध्ये कर्णधार बनला. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने नेतृत्व केले. न्यूझीलंड विरुद्ध टी२० मालिकेतून वगळल्याने तो खूश नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नकवी यांची भेट घेणार आहे. बाबर आझमला देखील असेच अनपेक्षितरित्या कर्णधारपदावरून दूर केले होते. आता तशीच परिस्थिती रिझवानपुढे उभी आहे.

सिलेक्टर्सशी पटत नाही...

रिझवानला झिम्बाब्वे विरुद्ध विश्रांती देण्यात आली होती. पण, नंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळला. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काही काळ विश्रांती घेतल्यानंतर, त्याला न्यूझीलंडविरुद्ध टी२० संघातून वगळण्यात आले. रिझवानचे मुख्य प्रशिक्षक आणि राष्ट्रीय निवडकर्ते आकिब जावेद यांच्याशी पटत नाही.

प्लेइंग XI वरून वाद

आकिब हे निवडकर्ते म्हणून येताच त्यांनी कसोटी संघाच्या अंतिम एकादश निवडीत हस्तक्षेप सुरू केला. त्यामुळे गॅरी कर्स्टन यांनी पद सोडले. नंतर ते जेसन गिलेस्पी यांच्या मागे लागले होते. रिझवान याच गोष्टीवर नाराज आहे. अंतिम एकादश निवडण्याचा अधिकार कर्णधाराला हवा, पूर्ण अधिकार दिले गेले नाहीत तर रिझवान एकदिवसीय कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :पाकिस्तानऑफ द फिल्डबाबर आजम