Join us

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं स्वतःच्याच खेळाडूची काढली लाज; बर्थ डे विश करताना पोस्ट केलं मधलं बोट!

सोशल मीडियावरील एक चूक वाऱ्यासारखी व्हायरल होण्यास, अजिबात वेळ लागत नाही. अशीच एक चूक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला महागात पडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 14:53 IST

Open in App

सोशल मीडियावरील एक चूक वाऱ्यासारखी व्हायरल होण्यास, अजिबात वेळ लागत नाही. अशीच एक चूक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला महागात पडली आहे. नजरचूकीनं केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावरपाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रोल केलं जात आहे. PCBनं त्यांच्याच संघातील जलदगती गोलंदाज हसन अली याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ही चूक केली आणि ट्रोल झाल्यानंतर ते ट्विट डिलीटही केलं.

हसन अली याचा २ जुलैला २७वा वाढदिवस होता आणि त्याला शुभेच्छा देणारं ट्विट पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केलं. यावेळी त्यांनी हसन अलीली शुभेच्छा देताना मधल्या बोटाचा सिम्बॉल पोस्ट केला अन् त्यावरून ते ट्रोल होऊ लागले. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. पण, तोपर्यंत त्याचे स्क्रीन शॉट व्हायरल झाले होते. 

दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे २०१४ ते २०३१ या कालावधीत होणाऱ्या सहा मोठ्या स्पर्धा आयोजनासाठी प्रस्ताव पाठवला आहे. पीसीबीला २०२६ आणि २०२८च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करायचे आहे. याशिवाय त्यांना २०२७ व २०३१च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचेही आयोजन करायचे आहे. तसेच २०२५ व २०२९ची चॅम्पियन्स ट्रॉफीचेही आयोजन करायचे आहे.

टॅग्स :पाकिस्तानसोशल मीडिया