Join us

Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं नवं फर्मान; पगारात 40 टक्के कपात स्वीकारा, नाहीतर घर...

Pakistan Cricket News: पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सध्या गोंधळाचे वातावरण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 15:12 IST

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपल्या संचालकांबाबत मोठा आदेश जारी केला आहे. 30 ते 40 टक्के पगार कपातीसाठी सर्वांनी तयार राहावे, अन्यथा घरी जा, असा इशाराच बोर्डाने दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या अशांततेच्या वातावरणाचा सामना करत आहे. रमीझ राजा यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तेव्हापासून ते बोर्डाला लक्ष्य करत आहेत. नजम सेठी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष झाले आहेत. जुनी निवड समितीही हटवण्यात आली आहे. संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला अंतरिम निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. शाहिद आफ्रिदी अध्यक्ष होताच सरफराज अहमदला संघाता स्थान मिळाले आहे.

क्रिकेट पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापन समितीने पदभार स्वीकारल्यापासून अनेक संचालकांवर दबाव आहे. त्यांना औपचारिकपणे 30 ते 40 टक्के वेतन कपात किंवा घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना देखील निर्णय घेण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांना 3 महिन्यांचा पगार दिला जाईल. बोर्डाचे सीईओ फैजल हसनेन यांना दरमहा 9.50 लाख एवढे मानधन मिळते. त्यांनाही याबाबत सांगण्यात आले आहे.

सर्वांना लाखो रूपयांचे मानधनपाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य वित्त अधिकारी जावेद मुर्तझा यांना सुमारे 5 लाख रुपये, संचालक उच्च कार्यप्रदर्शन नदीम खान यांना 5.50 लाख रुपये, संचालक आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑपरेशन्स झाकीर खान यांना 3.50 लाख रुपये, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेटचे संचालक नासिर हमीद यांना 3.20 लाख रुपये, इतर संचालकांना 4.75 लाख रुपये दिले जातात. तर मीडिया सामी अल हसन लाख आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी नजीबुल्ला यांना दरमहा 4.30 लाख रुपये मिळतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :पाकिस्तानशाहिद अफ्रिदीबाबर आजम
Open in App