VIDEO:"तुम्हाला वाटतंय का मी म्हातारा झालोय", बाबर आझमने पत्रकाराचा घेतला क्लास 

सततच्या क्रिकेटमुळे वर्कलोड वाढत असल्याचा मुद्दा जगभरातील क्रिकेटपटूंनी उपस्थित केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 04:58 PM2022-08-11T16:58:12+5:302022-08-11T17:01:39+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan captain Babar Azam give unique answer to a journalist's question on workload | VIDEO:"तुम्हाला वाटतंय का मी म्हातारा झालोय", बाबर आझमने पत्रकाराचा घेतला क्लास 

VIDEO:"तुम्हाला वाटतंय का मी म्हातारा झालोय", बाबर आझमने पत्रकाराचा घेतला क्लास 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सततच्या क्रिकेटमुळे वर्कलोड वाढत असल्याचा मुद्दा जगभरातील क्रिकेटपटूंनी उपस्थित केला आहे. सर्वप्रथम इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) एकदिवसीय क्रिकेटमधून संन्यास घेऊन या प्रकरणाला वाचा फोडली होती. व्यस्त वेळापत्रकामुळे आपण एकदिवसीय क्रिकेटला रामराम करत असल्याचे स्टोक्सने सांगितले होते. अलीकडेच न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने (Trent Bolt) सेंट्रल करारातून आपले नाव मागे घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. अशा परस्थितीत वर्कलोडबद्दल जेव्हा पाकिस्तानच्या कर्णधाराला प्रश्न विचारला तेव्हा त्याच्या उत्तराने सर्वांना आकर्षित केले. बाबर आझमने (Babar Azam) पत्रकाराचा क्लास घेत त्याची बोलतीच बंद केली. 

वर्कलोडवर उपाय म्हणजे फिटनेस - बाबर 
पाकिस्तानचा संघ आशिया चषक २०२२ च्या आधी नेदरलँडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारले की, "लोड खूप होत आहे ना?", यावर बाबर आझमने म्हटले, "जो तुम्ही प्रश्न विचारला आहे त्यावर मी एवढेच म्हणेन की हे सर्वकाही आपल्या फिटनेसवर अवलंबून आहे. ज्या प्रकारचा आमचा फिटनेस आहे त्यामुळे आम्ही याबाबत कधी विचार केला नाही. तुम्हाला वाटते का मी म्हातारा झालो आहे, किंवा आम्ही म्हातारे झालो आहोत? लोड जर वाढत असेल तर त्यासाठी अधिक फिट व्हावे लागेल. आम्ही त्याच्यावर काम करत आहोत", अशा शब्दांत बाबरने पत्रकाराची फिरकी घेतली. 

बाबर आझम सध्या शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे. बाबर टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे, तर कसोटीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थित आहे. आशिया चषक २०२२ चा थरार २७ ऑगस्टपासून यूएईच्या धरतीवर रंगणार आहे. ज्यातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणार आहे. हा ऐतिहासिक सामना २८ ऑगस्ट रोजी यूएईच्या धरतीवर पार पडेल. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे तर बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ असेल. 

 

Web Title: Pakistan captain Babar Azam give unique answer to a journalist's question on workload

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.