Video : मुंबईच्या ओम प्रकाश मिश्रा याच्यामुळे रद्द झाली पाकिस्तान-न्यूझीलंड मालिका; मंत्र्याचा अजब दावा 

न्यूझीलंडचा क्रिकेट संघ तीन वन डे व पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये दाखल झाला होता, परंतु पहिल्या वन डे सामन्याच्या दिवशीय त्यांनी माघार घेतली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 05:09 PM2021-09-24T17:09:06+5:302021-09-24T17:14:43+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan Blames Om Prakash Mishra Of 'Bol Na Aunty' Fame For NZ Cancelling Tour, Desis React With Memes | Video : मुंबईच्या ओम प्रकाश मिश्रा याच्यामुळे रद्द झाली पाकिस्तान-न्यूझीलंड मालिका; मंत्र्याचा अजब दावा 

Video : मुंबईच्या ओम प्रकाश मिश्रा याच्यामुळे रद्द झाली पाकिस्तान-न्यूझीलंड मालिका; मंत्र्याचा अजब दावा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंड क्रिकेट संघानं नुकताच पाकिस्तान दौरा रद्द केला. न्यूझीलंडचा क्रिकेट संघ तीन वन डे व पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये दाखल झाला होता, परंतु पहिल्या वन डे सामन्याच्या दिवशीय त्यांनी माघार घेतली. संघावर दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी न्यूझीलंड गुप्तचर विभागाला मिळाली होती आणि त्यानंतर हा निर्णय घेतला गेला. आता न्यूझीलंडच्या या निर्णयामागे भारताच्या ओम प्रकाश मिश्रा याचा संबंध जोडला जात आहे. पाकिस्तानी केंद्रीय सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचाही पाऊस पडला आहे.  

IPL 2021: कोरोना पॉझिटिव्ह टी नटराजनच्या जागी SRHच्या ताफ्यात जम्मू काश्मीरचा उम्रान मलिक

"पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अधिकारी, मंत्रालयाचं सुरक्षा पथक आणि इतर सर्व सदस्यांनी न्यूझीलंडला पाठविण्यात आलेल्या ई-मेलची माहिती मागवली. पण त्यांनाही जितकं आम्हाला माहिती मिळाली आहे तितकीच माहिती त्यांच्याकडे आहे. व्हिपीएनचा वापर करुन संबंधित ईमेल पाठविण्यात आला आहे. त्याचं लोकेशन सिंगापूर असं दाखवण्यात आलं आहे आणि ज्या डिव्हाइसमधून ई-मेल पाठविण्यात आला आहे ते भारतातील आहे. यासाठी फेक ई-मेल आयडीचा वापर करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात ई-मेल भारतातील महाराष्ट्र राज्यातून पाठवण्यात आला होता", असं फवाद चौधरी यांनी म्हटलं. 

याचवेळी त्यानं ई-मेल पाठवण्यासाठी जे उपकरण वापरले गेले, ते ओम प्रकाश मिश्रा याचे होते आणि तो मुंबईत राहतो. त्यांच्या या दाव्यानंतर मात्र नेटिझन्स सुटले आणि त्यांनी पाकिस्तानी मंत्र्याची लाज काढली.  


ओम प्रकाश मिश्रा यांनी २०१७साली ‘बोल ना आंटी आऊं क्या, घंटी मैं बजाऊं क्या’ हे गाणं गात सोशल मीडियावर वाहवाह मिळवली होती. 





Web Title: Pakistan Blames Om Prakash Mishra Of 'Bol Na Aunty' Fame For NZ Cancelling Tour, Desis React With Memes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.