IPL 2021: जम्मू-काश्मीरचा गोलंदाज आयपीएल खेळणार, सनरायझर्स हैदराबादची 'इभ्रत' वाचवणार; जाणून घ्या कोण आहे  उम्रान मलिक 

सनरायझर्सच्या खात्यात ८ सामन्यांत फक्त १ विजयासह २ गुणच राहिले आहेत आणि इथून प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवणे अशक्यच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:38 PM2021-09-24T16:38:22+5:302021-09-24T16:38:57+5:30

whatsapp join usJoin us
Umran Malik joins Sunrisers Hyderabad as short-term COVID-19 replacement for T Natarajan | IPL 2021: जम्मू-काश्मीरचा गोलंदाज आयपीएल खेळणार, सनरायझर्स हैदराबादची 'इभ्रत' वाचवणार; जाणून घ्या कोण आहे  उम्रान मलिक 

IPL 2021: जम्मू-काश्मीरचा गोलंदाज आयपीएल खेळणार, सनरायझर्स हैदराबादची 'इभ्रत' वाचवणार; जाणून घ्या कोण आहे  उम्रान मलिक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Umran Malik joins Sunrisers Hyderabad as short-term : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) प्ले ऑफ स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकले गेलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला अन् त्यांचा प्रमुख गोलंदाज टी नटराजन ( T Naratajan) याच्यासह सहा जणांना क्वारंटाइन व्हावं लागलं. यानंतरही SRHचा संघ मैदानावर उतरला, परंतु दिल्ली कॅपिटल्सकडून ( DC) त्यांना ८ विकेट्सनं हार मानावी लागली. या पराभवानंतर सनरायझर्सच्या खात्यात ८ सामन्यांत फक्त १ विजयासह २ गुणच राहिले आहेत आणि इथून प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवणे अशक्यच आहे. अशात आता SRHनं इभ्रत वाचवण्यासाठी संघात एक बदल केला आहे. 

 IPL 2021: KKRचा कर्णधार इयॉन मॉर्नगच्या डोक्यावर बंदीची टांगती तलवार, जाणून घ्या नेमकं कारण

सनरायझर्स हैदराबादनंटी नटराजन याच्याजागी संघात जम्मू-काश्मीरचा मध्यमगती गोलंदाज उम्रान मलिक ( Umran Malik) याचा समावेश केला आहे. मलिक याला शॉर्ट टर्म तत्वावर संघात दाखल करून घेतले आहे. ( Sunrisers Hyderabad have brought in medium pacer Umran Malik as a short-term COVID-19 replacement for T Natarajan) मलिक यानं जम्मू-काश्मीर संघाकडून एक ट्वेंटी-२० व लिस्ट ए सामना खेळला आहे आणि चार विकेट्स घेतल्या आहेत. तो SRH संघासोबत नेट बॉलर म्हणून आधीपासूनच होता. 

विराट कोहलीकडे RCBचे कर्णधार वाचवण्याची शेटवची संधी; फ्रँचायझीनं दिलीय तंबी?

आयपीएलचा नियम क्रमांक ६.१ ( c) नुसार फ्रँचायझीला शॉर्ट टर्म तत्वावर खेळाडूला संघात घेता येईल. संघातील मुख्य खेळाडू पुन्हा बायो बबलमध्ये परतेपर्यंत राखीव खेळाडू संघासोबत असेल.  

Web Title: Umran Malik joins Sunrisers Hyderabad as short-term COVID-19 replacement for T Natarajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.