Join us

बाबर आझमने विराट कोहलीला मागे टाकले; १० हजार धावांचा टप्पा पूर्ण

आशिया खंडातला सर्वात वेगाने १० हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 09:08 IST

Open in App

गाले : पाकिस्तानचा सध्याचा तारांकित फलंदाज बाबर आझमची अनेकादा विराटशी तुलना केली जाते. आता या चर्चांना पुन्हा एकदा उधाण येणार आहे. कारण बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकताच १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. मात्र हे शिखर गाठताना त्याने विराटला मागे टाकत आशिया खंडातला सर्वात वेगाने १० हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला २३२ डाव लागले. तर दुसरीकडे बाबर आझमने २२८ धावांमध्येच हा टप्पा सर केला. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत त्याने शतकी खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या १० हजारी मनसबदारांमध्ये स्वत:चे नाव नोंदवले. 

टॅग्स :बाबर आजमविराट कोहली
Open in App