Join us

PAK vs NZ Test : ...अन् न्यूझीलंडचे 10 फलंदाज 40 धावांत माघारी परतले

Pak vs NZ Test: फलंदाजांपाठोपाठ पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सोमवारी कमालच केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 15:44 IST

Open in App
ठळक मुद्देपाकिस्तानने पहिला डाव 5 बाद 418 धावांवर घोषित केलाप्रत्युत्तरा न्यूझीलंडचा पहिला डाव 90 धावांवर गडगडलायासीर शाहच्या 41 धावांत 8 बळी

दुबई, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड : फलंदाजांपाठोपाठ पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सोमवारी कमालच केली. त्यांनी दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या 10 फलंदाजांना अवघ्या 40 धावांवर माघारी धाडले. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील 5 बाद 418 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 90 धावा करू शकला. विशेष म्हणजे बिनबाद 50 अशा सुस्थितीत असलेला किवींचा संघ पुढील 40 धावांत ढेपाळला. पहिल्या दिवशी पाकिस्तानचे चार फलंदाज 207 धावांवर माघारी परतले. त्यानंतर हॅरीस सोहेल आणि बाबर यांनी पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारून दिली. हॅरीसने 147 धावा केल्या, तर बाबर 127 धावांवर नाबाद राहिला. त्यापाठोपाठ बाबर आझमने  नाबाद 127 धावांची खेळी करताना कसोटीतील पहिले शतक झळकावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने पहिला डाव 5 बाद 418 धावांवर घोषित केला.त्यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला जीत रावल आणि टॉम लॅथम यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, यासीर शाहने किवींची दैना उडवली. पुढील एक तास 15 मिनिटांत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ माघारी परतला. बिनबाद 50 वरून सर्वबाद 90 अशी न्यूझीलंडची केविलवाणी अवस्था झाली होती. यासीरने 8 विकेट्स घेतल्या आणि किवींच्या सहा खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. यासीरची ही कामगिरी पाकिस्तानच्या गोलंदाजाने केलेली तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.  

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडआयसीसी