Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026, PAK vs NZ Live Streaming : पाकिस्तान किंचित भारी! Super 8 मध्ये न्यूझीलंडला बरोबरीची संधी

इथं एक नजर टाकुयात दोन्ही संघातील आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील रेकॉर्ड आणि सुपर ८ मधील लढत कुठे  आणि कशी पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:25 IST

Open in App

ICC Men's T20 World Cup, New Zealand vs Pakistan, 41st Match, Super 8 Group 2  Live Streaming Info : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लढतीने आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत लढतींना सुरुवात होत आहे. हा सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हेड टू हेड रेकॉर्ड आणि फिरकीतील ताकद याचा विचार करता या सामन्यात पाकिस्तान एक पाऊल पुढे आहे. पण न्यूझीलंडचा संघ हा ICC च्या स्पर्धेत सातत्याने पहिल्या चारमध्ये खेळणाऱ्या संघापैकी एक आहे. ते  सर्वोत्तम कामगिरीसह पाकिस्तानविरुद्धच्या हेड टू हेड रेकॉर्ड बरोबरीत करत  सेमीची आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी मैदानात उतरतील. इथं एक नजर टाकुयात दोन्ही संघातील आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील रेकॉर्ड आणि सुपर ८ मधील लढत कुठे  आणि कशी पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

सुपर ८ मधील पहिला सामना!

सुपर ८ फेरीतील पहिली लढत पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियवर खेळवण्यात येईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता  या सामन्यातील पहिला चेंडू टाकला जाईल. अर्धातास अगोदर दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.   

युनुस यांचा क्रीडा सल्लागार शिक्षक असून खोटारडा, दोन बांगलादेशी खेळाडू 'मेंटल कोमा'मध्ये; कोच सलाहुद्दीन या...

  • सामन्याची तारिख: शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६
  • सामन्याचे ठिकाण : आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
  • सामन्याची वेळ वेळ: सायं. ७:०० वाजता
  • नाणेफेक: सायं. ६:३० वाजता 

कसा आहे पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड (T20)

  • पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील रेकॉर्ड पाहता दोन्ही संघात आतापर्यंत ४९ सामने खेळवण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या संघाने २४ वेळा तर न्यूझीलंडच्या संघाने २३ सामने जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. पाकिस्तान न्यूझीलंडपेक्षा एक पाऊल पुढे  आहे. पण हे अंतर फार नाही. त्यामुळे ही आकडेवारी सामना अधिक रोमहर्षक  होईल याचे संकेत देणारा अशी आहे.  
  • एकूण सामने: ४९
  • पाकिस्तान विजय: २४
  • न्यूझीलंड विजय: २३
  • अनिर्णित सामने : २ 
  • सर्वोच्च धावसंख्या: न्यूझीलंड २२६/८ (ऑकलंड, २०२४)
  • निचांकी धावसंख्या: न्यूझीलंड ८० सर्वबाद (क्राइस्टचर्च, २०१०)

PAK vs NZ  सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसंदर्भातील माहिती

टीव्हीवर थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्कऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग: जियो व्हॉटस्टारअ‍ॅप आणि वेबसाइट

 पाकिस्तान संघ

सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर झमान, ख्वाजा मोहम्मद नफाय (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाझ, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबझादा फरहान (यष्टिरक्षक), साईम अयूब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारीक.

 न्यूझीलंड संघ

जेम्स नीशम, डेव्हन कॉनवे (यष्टिरक्षक), डॅरिल मिचेल, ईश सोधी, जेकब डफी, मिचेल सॅन्टनर (कर्णधार), मार्क चॅपमन, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, काइल जेमीसन, टिम सिफर्ट (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, फिन अ‍ॅलन, रचिन रवींद्र.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : T20 World Cup 2026: Pakistan vs. New Zealand; Preview, Streaming Details

Web Summary : Pakistan faces New Zealand in Super 8. Pakistan has slight edge due to head-to-head record and spin bowling. New Zealand aims to level record. Match at Colombo; streaming on Jio Vootstar and Star Sports Network.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६पाकिस्तानन्यूझीलंडटी-20 क्रिकेट