Join us

PAK vs NZ : सलामीच्या लढतीआधी रिझवान फोडली बाबरसंदर्भातील गोष्ट; हा डाव अंगलट येणार?

पाक कर्णधार मोहम्मद रिझवान याने ओपनिंग मॅचमध्ये संघाकडून सलामीला कोण येणार? यासंदर्भाती चित्र स्पष्ट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:41 IST

Open in App

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या उद्घाटन सामन्यासाठी पाकिस्तान संघ फसलेल्या प्लानसहच मैदानात उतरणार असल्याचे दिसते. पाक कर्णधार मोहम्मद रिझवान याने ओपनिंग मॅचमध्ये संघाकडून सलामीला कोण येणार? यासंदर्भाती चित्र स्पष्ट केले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!  

बाबर आझम करेल पाकिस्तानच्या डावाची सुरुवात 

माजी कर्णधार बाबर आझमचं पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करेल, असे मोहम्मद रिझवान याने म्हटले आहे. यजमान पाकिस्तान संघाचा हा निर्णय याआधी अपयशी ठरला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पाकिस्तान संघानं घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यासंघाच्या सहभागाची तिरंगी वनडे मालिका आयोजित केली होती. या मालिकेत बाबर आझम सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. ही मालिकाही न्यूझीलंडच्या संघानं जिंकली. त्यामुळे आधीच तगडे आव्हान समोर असताना पुन्हा पाकिस्तानचा संघ फ्लॉप हिरोवर डाव लावणार असल्याचे दिसते.  

तिरंगी मालिकेती बाबर आझमची कामगिरी

बाबर आझम हा पाकिस्तान संघातील स्टार खेळाडू आहे, ही गोष्ट एकदम खरीये. पण सध्याच्या घडीला तो लौकिकाला साजेसा खेळ करण्यात सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय. तिरंगी वनडे मालिकेत तो अनुक्रमे १०, २३ आणि २९ धावांवर बाद झाला होता. ऑगस्ट २०२३ पासून त्याच्या भात्यातून एकही शतक आलेले नाही. १९ शतके खात्यात असलेल्या बाबरनं नेपाळ विरुद्ध अखेरचं शतक झळकावलं होते. त्याची कामगिरी अशीच राहिली तर पाकचा संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडू शकतो.

काय म्हणाला रिझवान?

सलामीच्या लढतीआधी डावाची सुरुवात कोण करणार या प्रश्नावर मोहम्मद रिझवान म्हणाला की, आमच्याकडे यासाठी पर्याय आहेत. पण लेफ्ट राइट कॉम्बिनेशनसाठी  बाबर आझमलाच डावाला सुरुवात करण्याची संधी मिळेल. तोही आपल्या बॅटिंग पोझिशनवर आनंदी आहे. तो तंत्रशुद्धरित्या उत्तम खेळाडू असल्यामुळेच सलामीला त्याला पसंती देण्यात आलीये, असेही रिझवान याने म्हटले आहे.

सलामीच्या लढतीत कोण मारणार बाजी?

हा निर्णय त्याच्या किंवा माझ्यासाठी नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येकजणच मेहनत घेत आहे. संघाच्या हितासाठीची बाबरवर मोठी जबाबादीर देण्यात आल्याचे तो म्हणाला. याशिवाय त्याने हॅरिस राउफच्या फिटनेसवरही अपडेट दिली. तो मैदानात उतरण्यासाठी फिट असल्याचे त्याने सांगितले आहे. सलामीच्या फ्लॉप प्रयोगासह पाकिस्तान सलामी लढत जिंकणार की, न्यूझीलंड डाव साधणार ते बुधवारी कळेल. 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५पाकिस्तानबाबर आजमभारत विरुद्ध पाकिस्तान