Join us  

PAK vs NZ: न्यूझीलंडचे नवखे खेळाडू ठरले वरचढ; पाकिस्तानचा वर्ल्ड कपचा संघ चीतपट

PAK vs NZ 3rd T20 Match: न्यूझीलंडने यजमान पाकिस्तानचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 12:31 PM

Open in App

PAK vs NZ T20 Series: सध्या न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहेत. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत असलेल्या किवी संघाने मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजय साकारला. बाबर आझमच्या नेतृत्वातील तगड्या पाकिस्तानी संघाची घरच्या मैदानावर पुन्हा एकदा फजिती झाल्याचे दिसले. तिसऱ्या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडने ७ गडी आणि १० चेंडू राखून विजय मिळवला.

नाणेफेक गमावल्यानंतर यजमान पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. बाबरच्या संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद १७८ धावा केल्या. यजमानांकडून शादाब खानने सर्वाधिक धावा केल्या, तर सैय अयुब (३२), बाबर आझम (३७), मोहम्मद रिझवान (२२), उस्मान खान (५), इरफान खान (नाबाद ३० धावा), इफ्तिखार अहमद (२) आणि शादाबने २० चेंडूत ४१ धावा कुटल्या. 

पाकिस्तानी संघ चीतपट१७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाने चमकदार कामगिरी केली. मार्क चॅपमनची स्फोटक खेळी न्यूझीलंडला विजय देऊन गेली. त्याने ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ४२ चेंडूत ८७ धावांची नाबाद खेळी केली. त्याला डीन फॉक्सक्रॉफ्टने चांगली साथ दिली. न्यूझीलंडने १८.२ षटकांत १७९ धावा करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. न्यूझीलंडचे वरिष्ठ खेळाडू आयपीएलमध्ये व्यग्र असल्याने ते पाकिस्तान दौऱ्यावर गेले नाहीत. नवख्या खेळाडूंसह किवी संघ मैदानात आहे. दुसरीकडे पाकिस्तानने आपला विश्वचषकाचा संघ उतरवला असून मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम या निवृत्त झालेल्या खेळाडूंची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे. 

PAK vs NZ ट्वेंटी-२० मालिकेतील पुढील सामने -२५ एप्रिल - लाहोर २७ एप्रिल - लाहोर 

टॅग्स :पाकिस्तानबाबर आजमन्यूझीलंडटी-20 क्रिकेट