ICC Womens World Cup 2025 Match Sana Mir Controversial Comment On Azad Kashmir : आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील वादग्रस्त प्रकरणांची मालिका पाहायला मिळाली. दुबईच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये पाकची जिरवल्यावरही टीम इंडियावर ट्रॉफीशिवाय मायदेशी परतण्याची वेळ आली. त्या ट्रॉफीचं काय? हा मुद्दा अजूनही गाजतोय. त्यात आता महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाक यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यातही भारतीय महिला क्रिकेट संघ 'नो हँडशेक' पॉलिसी कायम ठेवूनच मैदानात उतरणार आहे. या हायहोल्टेज लढती आधी पाकिस्तानची माजी महिला क्रिकेटर सना मीर ही वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. नेमकं ती काय म्हणाली? ICC तिच्यावर कठोर कारवाई करणार का? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॉमेंट्री करताना ती नको ते बरळली अन् नव्या वादाला तोंड फुटलं
पाकिस्तान महिला संघाने श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर बांगलादेश विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात केली. एका बाजूला संघावर पराभवाची नामुष्की ओढावली असताना दुसऱ्या बाजूला या सामन्यात समालोचन करताना पाकची माजी कर्णधाराने आपल्या ताफ्यातील खेळाडूची ओळख अधोरेखित करताना काश्मीरचा उल्लेख केला. त्यामुळे तिच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
नेमकं ती काय म्हणाली?
कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील लढतीवेळी सना मीर कॉमेंट्री करत होती. पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी तिने पाकच्या ताफ्यातील नतालिया परवेझच्या क्रिकेटमधील प्रवासावर भाष्य करताना सनानं 'आझाद काश्मिर' असा उल्लेख केा. सना म्हणाली की, "नतालिया आझाद काश्मिरची आहे. क्रिकेट खेळण्यासाठी तिला लाहोरमध्ये यावे लागते."
तिच्यावर नोकरी गमावण्याची वेळ येणार?
पाकिस्तानी बॅटरवर भाष्य करताना सना मीर हिने Live मॅचमध्ये आझाद काश्मिरचा उल्लेख केल्यानंतर ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. कॉमेंट्री करताना राजकीय मुद्यावर भाष्य केल्याचं चालतं का? असा प्रश्न उपस्थितीत करत अनेकांनी तिच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. याप्रकरणात ICC कडून तिच्यावर कारवाईही होऊ शकते. तिला नोकरी गमावण्याचा (कॉमेंट्री पॅनलमधून आउट) धोका निर्माण झाला आहे.
ICC चा काय सांगतो नियम?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार, कोणताही खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा अधिकारी सामना चालू असताना राजकीय विधानबाजी करू शकत नाही. सना मीरने पाक व्याप्त काश्मीरचा आझाद काश्मीर असा उल्लेख खेला आहे. त्यामुळे तिने ICC चा नियम मोडल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे तिला या प्रकरणात कारवाईला सामोरे जावे लागणार हे जवळपास निश्चत मानले जात आहे.