Join us

PAK vs AUS : पाकिस्तानला सुखद धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची माघार

Travis Head, Australia vs Pakistan : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 16:51 IST

Open in App

PAK vs AUS Series : आगामी काळात ऑस्ट्रेलिया वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर कांगारुंचा संघ भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळेल. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड याने भारताविरुद्ध २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी कुटुंबासोबत वेळ घालवता यावा, यासाठी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिका ४ नोव्हेंबरपासून खेळवली जाईल, तर १४ नोव्हेंबरपासून ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगेल.

हेड दुसऱ्यांदा पिता होणार आहे. तो पाकिस्तानविरुद्ध पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या वन डे आणि ट्वेंटी-२०  मालिकेत सहभागी होणार नाही. हेड भारताविरुद्ध २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी विश्रांती घेणार आहे. हेड वर्षातील ३३० दिवस घराबाहेर असतो. कुटुंबाच्या विस्तारासोबतच माझ्या प्राथमिकताही बदलतील त्यानुसार निर्णय घेईन, असेही हेड म्हणाला.

ऑस्ट्रेलियाचा वन डे संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), सीन अबॉट, कूपर कोनोली, जॅक फ्रेजर मॅकगर्क, आरोन हार्डी, जोश हेझलवुड, जोश इंग्लिस, मार्नस लाबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, ॲडम झाम्पा. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तानभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया