PAK vs AUS, 3rd Test : David Warner ने नाकावर टिच्चून केली पाकिस्तानी खेळाडूच्या सेलिब्रेशनची कॉपी; Video Viral

Pakistan vs Australia, 3rd Test : १९९८नंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने आजचा सामना जिंकून २४ वर्षांपूर्वीच्या निकालाची पुनरावृत्ती केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 05:53 PM2022-03-25T17:53:48+5:302022-03-25T17:54:17+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs AUS, 3rd Test : David Warner hilariously imitates Hasan Ali’s celebration after the latter gets out, Watch Video  | PAK vs AUS, 3rd Test : David Warner ने नाकावर टिच्चून केली पाकिस्तानी खेळाडूच्या सेलिब्रेशनची कॉपी; Video Viral

PAK vs AUS, 3rd Test : David Warner ने नाकावर टिच्चून केली पाकिस्तानी खेळाडूच्या सेलिब्रेशनची कॉपी; Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाने कराची कसोटी ११५ धावांनी जिंकून पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका १-० अशी खिशात घातली. विजयासाठी ठेवलेल्या ३५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ २३५ धावांवर तंबूत परतला. नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) पाच, कर्णधार पॅट कमिन्सने तीन विकेट्स घेतल्या. या मालिकेत १६५.३३च्या सरासरीने सर्वाधिक ४९६ धावा करणाऱ्या उस्मान ख्वाजाला ( Usman Khawaja) Player for the Series म्हणून गौरविण्यात आले. 

ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ३  बाद २२७ धावांवर घोषित करून पाकिस्तानसमोर विजयासाठी ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले.  प्रत्युत्तरात पाकिस्तानने ५ फलंदाज १६७ धावांवर गमावले होते इमाम-उल-हक ७० धावा करून माघारी परतला. अब्दुल्लाह शफिक ( २७), अझर  अली  ( १७), फवाद आलम ( ११), मोहम्मद रिझवान ( ०) हे अपयशी ठरले.  कर्णधार बाबर आजम ( ५५)  व साजिद खान यांनी पाकिस्तानचा संघर्ष सुरू ठेवला होता, परंतु नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथने स्लीपमध्ये भारी कॅच घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा डाव झटपट गुंडाळला. 

२०११नंतर ऑस्ट्रेलियाने आशियाई देशामध्ये मिळवलेला हा पहिला कसोटी मालिका विजय ठरला. त्यांनी २०११मध्ये श्रीलंकेविरुद्ध १-० अशी मालिका जिंकली होती. पाकिस्तानातील ऑस्ट्रेलियातील हा तिसरा कसोटी मालिका विजय आहे. याआधी २९५९-६०मध्ये रिची बेनॉड यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २-० अशी मालिका जिंकली होती. त्यानंतर मार्क टेलरच्या नेतृत्वाखाली १९९८-९९मध्ये १-० असा मालिका विजय मिळवला होता.  
 
या सामन्यात हसन अलीची ( Hasan Ali) विकेट नॅथन लियॉनने घेतली आणि सिली पॉईंटवर उभ्या असलेल्या डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) पाकिस्तानी खेळाडूच्या नाकावर टिच्चून सेलिब्रेशनची स्टाईल कॉपी केली.



Web Title: PAK vs AUS, 3rd Test : David Warner hilariously imitates Hasan Ali’s celebration after the latter gets out, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.