Join us

PAK vs AUS, 2nd Test : हेच बाकी होतं!; पाकिस्तानचे खेळाडू स्टीव्ह स्मिथला विचारतायेत DRS घेऊ की नको, Video

Pakistan vs Australia, 2nd Test Live Updates : रावळपिंडी कसोटी ड्रॉ राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतलेला पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 16:24 IST

Open in App

Pakistan vs Australia, 2nd Test Live Updates : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी कसोटी लढत कराची येथे सुरू आहे. रावळपिंडी खेळपट्टीवर टीका होत असताना कराचीची खेळपट्टीही फलंदाजांसाठी पोषक असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत ७ बाद ४२७ धावांचा डोंगर उभा केला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) याने पाकिस्तानी गोलंदाजांना नाचवले. त्यामुळे यजमान एवढे सैरभैर झाले होते की DRS घेऊ की नको, अशी विचारणा त्यांनी थेट स्मिथलाच केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

पहिल्या दिवसाच्या ७६व्या षटकात हा प्रसंग घडला. जेव्हा नौमान अलीने LBW साठी अपील केले. मैदानावरील अम्पायरने स्मिथ नाबाद असल्याचे सांगितले. स्मिथने चेंडू मारण्यासाठी बॅटच वळवली नाही आणि तो पॅडवर आदळला. जेव्हा DRS च्या १५ सेंकदाचा वेळ सुरू झाला तेव्हा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान स्मिथजवळ आला आणि त्यालाच विचारू लागला. अली DRS घेण्याच्या पक्षात होता, तरीही रिझवानने DRS घेऊ की नको असे स्मिथला विचारले. कर्णधार बाबर आजमने अखेरीस DRS घेतला नाही.   

पाहा व्हिडीओ... स्मिथने पहिल्या दिवसाच्या खेळात २१४ चेंडूंत ७२ धावांची खेळी केली.  सलामीवीर उस्मान ख्वाजाने शतकी खेळी करताना संघाला दिवसअखेर ४ बाद ३३० धावा उभारून दिल्या. ख्वाजा ३६९ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह १६० धावांवर बाद झाला. नॅथन लियॉन ( ३८), ट्रॅव्हिस हेड ( २३), कॅमेरून ग्रीन ( २८), डेव्हिड वॉर्नर ( ३६) यांना मोठी खेळी करता आली नाही. अॅलेक्स केरी ५० धावांवर खेळतोय. 

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया
Open in App