Join us

PAK vs AUS, 2nd Test : आपलेच दात अन आपलेच ओठ!; पाकिस्तानी फलंदाजांचे लोटांगण पाहून लहान पोरानेही काढली इभ्रत, Photo Viral 

PAK vs AUS, 2nd Test : दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ९ बाद ५५६ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची हालत खराब झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:37 IST

Open in App

PAK vs AUS, 2nd Test : दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ९ बाद ५५६ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची हालत खराब झाली आहे. मिचेल स्टार्कने पाकिस्तानचे धाबे दणाणून सोडले. त्याच्या भन्नाट व वेगवान गोलंदाजीसमोर पाकिस्तानी फलंदाज चाचपडले. यजमानांची अशी दयनीय अवस्था पाहून लहान पोराने त्यांची इभ्रत काढली. या पाटा खेळपट्टीवर मी सहज शतक झळकावेन, असे पोस्टर हाती घेऊन तो मैदानावर दिसला. 

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने २१४ चेंडूंत ७२ धावांची खेळी केली.  सलामीवीर उस्मान ख्वाजाने शतकी खेळी करताना संघाला पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३३० धावा उभारून दिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ख्वाजा ३६९ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह १६० धावांवर बाद झाला. नॅथन लियॉन ( ३८), ट्रॅव्हिस हेड ( २३), कॅमेरून ग्रीन ( २८), डेव्हिड वॉर्नर ( ३६) यांना मोठी खेळी करता आली नाही. अॅलेक्स केरी ९३ धावांवर बाद झाला. कर्णधार पॅट कमिन्स ३४ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ बाद ५५६ धावांवर घोषित केला.

प्रत्युत्तरात, पाकिस्तानचे अब्दुल्लाह शफिक ( १३) व इमाम-उल-हक( २०) हे झटपट माघारी परतले. पाटा विकेटवर रन आऊट झाला म्हणून शफिकचेही वाभाडे निघाले. अझर अली ( १४), फवाद आलम ( ०), मोहम्मद रिझवान ( ६), फहीम अशरफ ( ४) व साजीद खान ( ५) हे मिचेल स्टार्क व पॅट कमिन्सच्या भेदक माऱ्यासमोर ढेपाळले. पाकिस्तानचे पाच फलंदाज ३७ धावांत माघारी परतल्यान त्यांची अवस्था ७ बाद १०० अशी झाली आहे. 

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया
Open in App