Join us

PAK vs AUS 1st Test : ७६ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवली गेली ऐतिहासिक कामगिरी; ऑस्ट्रेलियन-पाकिस्तानी ठरले लय भारी! 

Pakistan vs Australia, 1st Test Rawalpindi : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात रावळपिंडी येथील पहिली कसोटी ड्रॉच्या दिशेने वाट करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 15:02 IST

Open in App

Pakistan vs Australia, 1st Test Rawalpindi : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात रावळपिंडी येथील पहिली कसोटी ड्रॉच्या दिशेने वाट करत आहे. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील ४ बाद  ४७६ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने  ४५९ धावा केल्या. त्यानंतर आजच्या पाचव्या दिवशी अब्दुल्लाह शफिक व इमाम-उल-हक यांनी पहिल्या विकेटसाठी ४६व्या षटकात १५० धावांची नाबाद भागीदारी केली आहे आणि १६३ धावांची आघाडी घेतली आहे. रावळपिंडीच्या खेळपट्टीवरून पाकिस्तानी चाहते प्रचंड नाराज दिसत असले तरी एका बातमीने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार आहे. १९४६-४७ नंतर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एक मोठ विक्रम नोंदवला गेला आहे आणि त्यात पाकिस्तानचा खूप मोठा वाटा आहे. 

पाकिस्तानने पहिला डाव ४ बाद  ४७६ धावांवर डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियानेही सडेतोड उत्तर दिले.  डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची विक्रमी भागीदारी केली. वॉर्नर ६८ धावांवर माघारी परतला. ख्वाजाला शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतावे लागले. त्याने १५९ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने ९७ धावा केल्या. ट्रेव्हिस हेड ( ८) लगेच बाद झाला. मार्नस लाबुशेनने १५८ चेंडूंत १२ चौकारांसह ९० धावांची खेळी केली. स्मिथ ७८, तर कॅमेरून ग्रीन ४८ धावांवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५९ धावा केल्या.   

१७ धावांची आघाडी घेऊन दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली. अब्दुल्लाह शफिक व इमान-उल-हक यांनी पहिल्या डावात शतकी भागीदारी केली होती आणि दुसऱ्या डावातही या जोडीने ४६ षटकांत १५० धावा जोडल्या. पहिल्या डावात शफिक ४४ धावांवर बाद झाला होता, तर इमामने १५७ धावा कुटल्या होत्या. त्याला अझर अलीच्या १८५ धावांचीही साथ मिळाली होती. दुसऱ्या डावात शफिक ७९ व इमाम ७० धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच कसोटीच्या दोन्ही डावांत शतकी भागीदारी करणारी ही पाचवी जोडी ठरली आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही डावांत शतकी भागीदारी करणारे फलंदाज

  • १९२४ -  जॅक हॉब्स व हेर्बर्ट सटक्लिफ ( इंग्लंड)
  • १९४७ - लेन हटन व सिरिल बॉशब्रूक ( इंग्लंड) 
  • १९४८ - लेन हटन व सिरिल बॉशब्रूक ( इंग्लंड) 
  • १९७१ - जेफ्ररी बॉयकॉट व जॉन एडरीच ( इंग्लंड)
  • २०२२ - अब्दुल्लाह शफिक व इमान-उल-हक ( पाकिस्तान)

 

  • शिवाय एकाच कसोटीच्या तीन डावांत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी होण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एडलेड ओव्हल येथे १९४६-४७ मध्ये खेळलेल्या कसोटीत असा पराक्रम झाला होता. 

 

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया
Open in App