Join us

PAK vs AUS 1st ODI : ऑस्ट्रेलियाने पाडला २८ चेंडूंत १२४ धावांचा पाऊस; Travis Headने केली पाकिस्तानची फ्री स्टाईल धुलाई!

PAK vs AUS 1st ODI : कसोटी मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात दणक्यात सुरूवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 20:38 IST

Open in App

PAK vs AUS 1st ODI : कसोटी मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात दणक्यात सुरूवात केली. पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करताना धावांचा डोंगर उभा केला. ट्रॅव्हिस हेड  ( Travis Head) ने ७० चेंडूंत शतक झळकावून पाकिस्तानसमोर विजयासाठी ३१४ धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी या सामन्यात २२ चौकार व ६ षटकार खेचून अवघ्या २८ चेंडूंत १२४ धावांचा पाऊस पाडला.

ट्रॅव्हिस हेड व कर्णधार आरोन फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली आणि यात फिंचच्या केवळ २३ धावा होत्या.  हेड पाकिस्तानी गोलंदाजांना कुटत होता. १५व्या षटकात जाहीद महमूदने फिंचला बाद केले. त्यानंतर बेन मॅकडेरमोटने अर्धशतकी खेळी करून हेडला साथ दिली. हेड ७२ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०१ धावांवर इफ्तिकार अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. मॅकडेरमोटने ७० चेंडूंत ४ चौकारांसह ५५ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने ३० चेंडूंत नाबाद ४० धावा केल्या.

मार्नस लाबुशेन ( २५), मार्कस स्टॉयनिस ( २६), सीन अबॉट  ( १४) यांनीही योगदान दिले. पाकिस्तानच्या हरिस रौफ व जाहीदने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३१३ धावा केल्या. पाकिस्तानने १४ षटकांत १ बाद ६६ धावा केल्या आहेत. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तान
Open in App