Join us  

अन्य फलंदाजांना दावा सादर करण्याची संधी - संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर

ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात वॉर्नरच्या पर्यायावर चर्वितचर्वण सुरू आहे. त्यातील काही बर्न्सचे समर्थन करीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 4:36 AM

Open in App

कॅनबरा : डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे किमान पहिल्या कसोटी सामन्यापर्यंत बाहेर झाला आहे. त्यामुळे पाहुण्या संघाविरुद्ध आगामी सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघातर्फे चांगली कामगिरी करणाऱ्या फलंदाजाला कसोटीत संधी मिळेल, असे संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात वॉर्नरच्या पर्यायावर चर्वितचर्वण सुरू आहे. त्यातील काही बर्न्सचे समर्थन करीत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तो संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. काही जाणकारांनी युवा विलियम पुकोवस्कीला डावाची सुरुवात करण्याची संधी देण्याची मागणी केली आहे. वॉर्नरच्या दुखापतीमुळे समीकरण बदलले आहे. अशास्थितीत बर्न्स व पुकोवस्की या दोघांनाही डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे त्यांच्यावरील दबाव  कमी होईल, असे लँगर यांनी म्हटले आहे.

तिसऱ्या वन-डे लढतीसाठी येथे दाखल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने लँगरच्या हवाल्याने म्हटले की, ‘आश्चर्यचकित होण्याची बाब नाही. आता थोडा दिलासा मिळाल्यासारखे वाटत आहे. आम्ही काही सामने जिंकले आहे. कसोटी सामन्यात कुणाची निवड करायची, याची मला चिंता नाही.’ ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ ६ डिसेंबरपासून भारत ‘अ’ संघाविरुद्ध खेळणार आहे.

सर्वांत कठीण काम म्हणजे संघनिवड आहे. पण काही दिवसामध्ये ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ खेळणार असून त्यातील खेळाडूंकडे आपला दावा सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. त्यानंतर सिडनीमध्ये गुलाबी चेंडूने दिवस-रात्र सराव सामना आहे. त्या लढतीत कुणाची कामगिरी उल्लेखनीय ठरते, हे बघावे लागेल.’ कसोटी मालिकेची सुरुवात १७ डिसेंबरपासून ॲडिलेडमध्ये दिवस-रात्र कसोटीने होणार आहे.वॉर्नर स्नायूच्या दुखापतीने त्रस्त आहे. ड्रेसिंग रुममध्येही त्याला त्रास जाणवत होता. पहिल्या कसोटीत तो खेळेल, असे मला वाटत नाही. पण तो व्यावसायिक खेळाडू असून सज्ज होण्यासाठी  प्रयत्न करेल.’ 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नर