Join us  

भारतीय क्रिकेटपटूंना इंग्लंडला जाण्यापूर्वी घ्यावी लागेल फक्त कोव्हिशिल्डचीच लस; जाणून घ्या कारण

इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व स्थगित केल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या कुटुंबीयांकडे परतले आहेत. भारतीय खेळाडू काही दिवसांसाठी कुटुंबीयासोबत राहणार असून नंतर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 12:11 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व स्थगित केल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या कुटुंबीयांकडे परतले आहेत. भारतीय खेळाडू काही दिवसांसाठी कुटुंबीयासोबत राहणार असून नंतर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत. १८ ते २३ जून या कालावधीत तेथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल होणार आहे आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आतापासून तयारीला लागले आहेत. चार महिन्यांचा हा दौरा आहे, त्याला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना फक्त कोव्हिशिल्ड ( Covishield ) ची लस घ्यावी लागेल, असे वृत्त Times Nowने प्रसिद्ध केलं आहे. IPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव!

भारत सरकारनं १ मे पासून १८ ते ४४ वर्षांतील नागरीकांसाठी लसिकरणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यात भारतीय क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. गुरुवारी भारताचा सलामीवीर शिखर धवन यानं कोरोनाचा पहिला डोस घेतला. आयपीएल दरम्यान खेळाडूंना कोरोनाची लस  घ्यावी लागले, परंतु आयपीएल स्थगित झाल्यामुळे खेळाडूंचे लसीकरण झाले नाही.  आयपीएलमध्ये सर्व खेळाडू बायो बबलमध्ये होते. आता त्यांना ते राहत असलेल्या ठिकाणी लस घ्यावी लागणार आहे. पण, इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंना फक्त कोव्हिशिल्ड लस घेण्याचा सल्ला दिला आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात घेतला सहभाग; केली दोन कोटींची मदत!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय खेळाडू लंडनमध्ये जाणार आहेत. त्यांना दुसरा डोस घेता येणार नाही. कोव्हिशिल्ड ही लसीचा दुसरा डोस खेळाडूंना लंडनमध्येही घेता येईल, त्यामुळे हा सल्ला देण्यात आला आहे. ''कोव्हिशिल्ड ही लंडनच्या AstraZeneca vaccineच उत्पादन आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना दुसरा डोस तिथे घेता येईल,''असे सूत्रांनी सांगितले.   न्यूझीलंडचे सर्व खेळाडू मायदेशी परतले, पण केन विलियम्सनसह तिघे भारतातच राहिले; जाणून घ्या कारण

या खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यासाठी केली जाऊ शकते निवड  

  1. सलामीवीर - रोहित शर्मा, शुबमन गिल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, अभिमन्यू इस्वरन, प्रियांक पांचाळ/देवदत्त  पडिक्कल
  2. मधली फळी - चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, लोकेश राहुल
  3. अष्टपैलू खेळाडू - वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या
  4. फिरकीपटू - आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चहर
  5. जलदगती गोलंदाज - जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, भुवनेश्वर कुमार 
  6. नेट बॉलर - चेतन सकारिया, अंकित राजपूत  
टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध इंग्लंड