Virat Kohli and Anushka Sharma - विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात घेतला सहभाग; केली दोन कोटींची मदत!

Virat Kohli and Anushka Sharma has started a fund raise for the fight against COVID-19 crisis in India through Ketto : आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहलीनं ( Virat Kohli) व अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेतला आहे. Virat Kohli and Anushka Sharma donated 2 crore for the COVID-19 crisis in India through Ketto

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 10:50 AM2021-05-07T10:50:18+5:302021-05-07T10:53:39+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli and Anushka Sharma has started a fund raise for the fight against COVID-19 crisis in India through Ketto | Virat Kohli and Anushka Sharma - विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात घेतला सहभाग; केली दोन कोटींची मदत!

Virat Kohli and Anushka Sharma - विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात घेतला सहभाग; केली दोन कोटींची मदत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहलीनं ( Virat Kohli) व अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेतला आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर या दोघांनी एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. Ketto यांच्यासोबत मिळून ही दोघं निधी गोळा करणार आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दोघांनी नुसतं आवाहनच केलं नाही तर स्वतः दोन कोटींची मदतही केली. Virat Kohli and Anushka Sharma donated 2 crore for the COVID-19 crisis in India through Ketto

''देशातील आरोग्य यंत्रणा न थकता, न थांबता कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहेत. पण, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आपल्या आरोग्य यंत्रणेलाच आव्हान दिलं आहे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला मदत करण्याची गरज आहे.  अनुष्का आणि मी Kettoवर एक मोहीमु सुरू केली आहे. त्यातून जमा होणार निधी हा कोरोना लढ्यासाठी वापरला जाणार आहे. तुमचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे. आयुष्य वाचवण्यासाठी छोटीशी मदतही खूप मोठी असते.'' असे ही दोघं या व्हिडीओत म्हणत आहेत. 

 
दरम्यान, मुंबईत कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी विराटनं पुढाकार घेतल आहे. विराटनं याआधीही गतवर्षी कोरोना लढ्यात पत्नी अनुष्का शर्मासह आर्थिक मदत केली होती. भारतीय संघाचा कर्णधार विराटनं युवा सेनेसोबत या लढाईत मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. युवा सेनेचा कोर कमिटी सदस्य ( Core - committee Member ) राहुल एन कनाल याच्यासोबत विराटनं चर्चा केली आणि रणनिती ठरवली. या भेटीचे फोटो राहुल कनालनं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कनालनं लिहिलं की,''आज आपल्या कर्णधाराची भेट घेतली. कोरोनाविरुद्ध त्यानं जे युद्ध छेडले आहे, ते पाहून त्याच्या प्रतीचा आदर आणखी वाढला. त्याच्या प्रयत्नांना यश मिळो, हीच प्रार्थना करतो.''  

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मिळून पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार लावला होता. त्यांनी नेमकी किती मदत केली हे जाहीर केलं नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ही मदत 3 कोटींची होती.

Read in English

Web Title: Virat Kohli and Anushka Sharma has started a fund raise for the fight against COVID-19 crisis in India through Ketto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.