ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा मायदेशी परतला आहे. या मालिकेत रोहितने एक अर्धशतक आणि एक नाबाद शतक झळकावले. त्याला 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताने ३ पैकी केवळ एकच सामना जिंकला. मात्र, रोहित आणि विराट कोहलीच्या दमदार खेळाने ते 'मिशन वर्ल्ड कप २०२७' साठी आशावादी असल्याचे दिसून आले.
या मालिकेनंतर रोहित शर्मा भारतात परतला आहे. मात्र भारतात परतण्यापूर्वीच रोहित शर्माने 'X' अकाउंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली. यात त्याने लिहिले, "सिडनीला शेवटचा निरोप". भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना सिडनी येथे झाला. या सामन्यात रोहितने नाबाद शतक झळकावत भारताला ९ विकेट्सने विजय मिळवून दिला.
रोहितचे शतकांचे अर्धशतक... -
याच मालिकेत रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या शतकांचे अर्धशतकही पूर्ण केले. त्याने कसोटी सामन्यांत १२, एकदिवसीय सामन्यात ३३, आणि टी२० मध्ये ५ शतके झळकावली आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये परदेशी फलंदाजाचे सर्वाधिक एकदिवसीय शतके -
रोहित शर्मा - ६ शतके (३३ डाव)
विराट कोहली - ५ शतके (३२ डाव)
कुमार संगकारा - ५ शतके (४९ डाव)
कुठल्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके -
विराट कोहली - १० विरुद्ध श्रीलंका
विराट कोहली - ९ विरुद्ध वेस्ट इंडिज
सचिन तेंडुलकर - ९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया
रोहित शर्मा - ९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया