Join us

आयुष्यात एकदाच कॉफी प्यायलो!; 'कॉफी विथ करण' वादावर Hardik Pandya म्हणतो...

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल हे 'कॉफी विथ करण' कार्यक्रमातील वाद आयुष्यात कधीच विसरणार नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 14:32 IST

Open in App

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल हे 'कॉफी विथ करण' कार्यक्रमातील वाद आयुष्यात कधीच विसरणार नाहीत. या कार्यक्रमात महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे या दोघांना मोठा भुर्दंड सोसावा लागला. दोघांना चालू दौऱ्यातून मायदेशात बोलावण्यात आले आणि रोख रकमेचा दंडही भरावा लागला. सध्या कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा रद्द आहेत आणि त्यामुळे खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहे. भारताचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकनं इंस्टाग्रामवर लाईव्ह इंटरॅक्शन घेतलं. त्यात त्यानं हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्याशी गप्पा मारल्या. यात कार्तिकनं भारताच्या अष्टपैलू खेळाडू हार्दिकला कॉफी बद्दल प्रश्न विचारून डिवचले.

हार्दिकला कॉफी पिऊन वर्ष झालं असेल, असं कार्तिकनं डिवचले. त्यावर हार्दिकनं त्वरित उत्तर दिले. तो म्हणाला,''मला कॉफी आवडत नाही. मी ग्रीन टी पितो. मी आयुष्यात एकदाच कॉफी प्यायलो आणि माझ्यासाठी ती खूप महागडी ठरली. स्टारबक्सपेक्षाही ती कॉफी महागडी होती, यावर मी पैज लावू शकतो.''

यावेळी कृणालनं 13 वर्षांपूर्वीचा हार्दिकचा एक फोटो कार्तिकला दाखवला. त्यावर कार्तिक म्हणाला,'' हा फोटो पाहून असं वाटतंय की कुणीतरी तंबाखू खाऊन थुंकलं आहे.'' कार्तिकच्या या विधानावर तिघेही खुप हसले.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...

KL Rahulला कथित Ex-Girlfriendनं केलं अनफॉलो? जाणून घ्या सत्य

युवराज सिंगचा मोठा खुलासा;'या' खेळाडूमुळे निवृत्तीचा विचार डोक्यात सुरू झाला!

फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू मागतोय माफी; म्हणतो दुसरी संधी द्या...

 

टॅग्स :हार्दिक पांड्यादिनेश कार्तिककॉफी विथ करण 6