KL Rahulला कथित Ex-Girlfriendनं केलं अनफॉलो? जाणून घ्या सत्य

क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा वारंवार सुरूच असतात... सध्या भारताचा फलंदाज लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

लोकेशच्या वाढदिवशी अथियानं प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यावर लोकेशनंही लव्ह इमोजी पोस्ट करून होकार कळलवा. पण, या कबुलीनंतर लोकेशच्या कथित Ex-Girlfriendनं त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केल्याच्या चर्चा रंगल्या.

अभिनेत्री निधी अगेरवार असे लोकेशच्या कथित Ex-Girlfriendचं नाव आहे. अथिया शेट्टीपूर्वी भारतीय फलंदाजाचं नाव निधीशी जोडलं गेलं होतं.

मुन्ना मायकेल या बॉलिवूड चित्रपटात काम केलेली निधी भारतीय फलंदाजाचा डेट करत असल्याची चर्चा होती, परंतु या दोघांनी कधीच त्याबाबत काहीच विधान केलं नाही.

निधीनं नुकतंच लोकेशला इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनफॉलो केल्याचे वृत्त आले. निधी-लोकेश यांच्या प्रेमाची चर्चा वर्षभर सुरू होती, परंतु कोणाकडूनही त्याला दुजोरा मिळत नव्हता.

पण, आता या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि निधीनं लोकेशला अनफॉलो केल्याचे वृत्त समोर येत आहे.

त्यावर निधीनं तिचं मत मांडलं आहे. ती म्हणाली,''मी लोकेशला अनफॉलो केलेलं नाही आणि आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत. ''

निधी आणि लोकेश एकाच शहरातील ( बंगळुरू) आहेत आणि दोघांचे काही कॉमन फ्रेंड्सही आहेत.