कॉफी विथ करण प्रकरण : हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना लोकपालाकडून नोटीस

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्य केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 13:33 IST2019-04-01T13:21:20+5:302019-04-01T13:33:47+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ombudsman sends notices to Hardik Pandya, KL Rahul for deposition in ‘Koffee’ controversy | कॉफी विथ करण प्रकरण : हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना लोकपालाकडून नोटीस

कॉफी विथ करण प्रकरण : हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना लोकपालाकडून नोटीस

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्य केले होते. त्यानंतर झालेल्या टीकेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) पांड्या व राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागली होती. पण, काही महिन्यांनतर या दोघांनाही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले लोकपाल या प्रकरणाची चौकशी करत आहेत. लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी के जैन यांनी पांड्या व राहुल यांना नोटीस बजावली आहे. 

प्रशासकिय समितीनेही पांड्या व राहुल यांना तात्पुरते निलंबित केले होते. पण, लोकपाल यांच्याकडून निकाल येण्यापूर्वी ती बंदी उठवण्यात आली होती. न्यायाधीश जैन यांनी सांगितले की,'' हार्दिक पांड्यालोकेश राहुल यांना साक्ष देण्यासाठी मागील आठवड्यात नोटीस पाठवली आहे.''  मात्र, यासंदर्भात बीसीसीआयनं पांड्या व राहुल यांच्याशी चर्चा केली की नाही, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. '' नियमानुसार मला त्यांचीही बाजू ऐकावी लागणार. आता साक्ष द्यायला कधी यायचे याचा निर्णय त्यांनी घ्यावा,'' असेही जैन यांनी स्पष्ट केले.

जैन यांच्याकडे माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याबद्दलही हितसंबंध जपण्याबद्दल तक्रार आली आहे. गांगुली हा बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागारही आहे. 

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात पांड्या असं नक्की बोलला तरी काय? 
करण जोहर : नाईट क्लबमध्ये तु मुलींना त्यांची नावं का नाही विचारत?
हार्दिक पांड्याः मला प्रत्येकीची नावं लक्षात राहत नाही. क्लबमध्ये मुली कशा चालतात हे मला पाहणे आणि निरिक्षण करायला आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स केले. तेव्हा मी घरी येऊन म्हणालो की, मै करके आया आज ( आज मी करून आलो).''
कुटुंबीयही  किती कूल आहेत हे पांड्या सांगू लागला. तो म्हणाला,''एका पार्टीमध्ये आई-वडिलांनी मला विचारले, अच्छा तेरा वाला कौन सा है ( यातील तुझी गर्लफ्रेंड कोण?). त्यावेळी मी ही, ही, ही ( अनेक मुलींकडे बोट दाखवत) असे म्हणालो आणि त्यावर त्यांनी माझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. ''
करण जोहर : तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?
लोकेश राहुल : हा निर्णय त्या मुलीवर सोडू
हार्दिक पांड्या : असं काही नसत, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून आहे. ज्याला मिळेल त्यानं घेऊन जावं.

Web Title: Ombudsman sends notices to Hardik Pandya, KL Rahul for deposition in ‘Koffee’ controversy